Tokyo Olympics : जपानमध्ये भारतीयांना नो एन्ट्री; खेळाडू कसे पोहचणार?

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 14 मे 2021

टोकियो ऑलिम्पिकसाठी आता फक्त 2 महिने बाकी आहेत.

टोकियो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympics) आता फक्त 2 महिने बाकी आहेत. यापूर्वी, टोकियो आयोजन समितीने ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकसाठी (Paralympic) परदेशातून आलेल्या अधिकाऱ्यांची संख्या 60 टक्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन टूर्नामेंट्समुळे सुमारे एक लाख 80 हजार अधिकारी टोकियोला पोहोचणार होते.परंतू, आता फक्त 80 हजार अधिकारी या स्पर्धेला जाणार आहेत. दुसरीकडे, भारतासाठी (India) अडचणी वाढल्या आहेत. जपानने भारतावर (Japan) अनिश्चित काळासाठी प्रवासी बंदी लागू केली आहे. समर ऑलिम्पिकची सुरवात 24 जुलैला होणार असून पॅरालिम्पिकची सुरवात 24 ऑगष्टला होणार आहे.(No entry to Indians in Japan How will the players reach)

Ashes 2021: 26 वर्षांनंतर प्रथमच अ‍ॅशेजचा अंतिम सामना गाबा स्टेडियमवर

खेळाडूंच्या संख्येत कोणताही बदल नाही
टोकयो आयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुतो म्हणाले की, खेळाडूंच्या संख्येत कोणताही बदल झालेला नाही. 15 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. केवळ अधिकाऱ्यांची संख्या कमी केली आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील कोरोनाची स्थिती पाहून अजून अधिकाऱ्यांची संख्या कमी केली जाऊ शकते.

 भारत, नेपाळ आणि पाकिस्तानवर प्रवासी बंदी
जपानने शुक्रवारी भारत, नेपाळ आणि पाकिस्तानवर प्रवासी बंदी घातली आहे. ही बंदी किती काळ चालेल हे ठरलेले नाही. यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अडचणी वाढल्या आहेत. या वेळी आयओए 13 क्रीडा स्पर्धांसाठी 100 हून अधिक खेळाडू पाठवण्याची तयारी करत आहे. जर ही बंदी कायम राहिली तर खेळाडूंना शक्य तितक्या लवकर टोकियोला जावे लागेल. याशिवाय सर्व खेळाडू देशात तयार केलेल्या शिबिरातही राहू शकतात. जपानने या शिबिराला रेड लिस्टमध्ये स्थान दिलेले नाही.

माजी फुटबॉलपटू मदेरा कोविड योद्ध्यांच्या मदतीस

अधिकाऱ्यांच्या संख्येत 60 टक्के तर आयपीसीच्या कर्मचारी संख्येत 25 टक्के कपात
यापूर्वी गुरुवारी आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्र्यू पार्सस यांनी अधिकाऱ्यांच्या संख्येत 60 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की ज्यांना आवश्यक असेल त्यांनाच ऑलिम्पिकसाठी परवानगी देण्यात येईल.आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने  कर्मचार्‍यांची संख्या 25 टक्क्यांनी कमी केली आहे. त्याचबरोबर, जपानमधील बर्‍याच डॉक्टरांनी ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला आहे. ते म्हणाले की, जगात लोक मरत आहेत अशा वेळी ऑलिम्पिक आयोजित करण्याचा योग्य निर्णय नाही. जपानमधील लोकही यातून सुरक्षित राहणार नाहीत.

संबंधित बातम्या