जडेजा प्रकरणावरून एवढी चर्चा कशाला : सुनिल गावसकर

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 6 डिसेंबर 2020

जखमी झालेल्या रवींद्र जडेजाऐवजी भारतीय संघाला ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ देण्यावरून एवढी चर्चा होणे हे आश्‍चर्यकारक आहे, असे मत भारताचे दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मांडले.

नवी दिल्ली :  जखमी झालेल्या रवींद्र जडेजाऐवजी भारतीय संघाला ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ देण्यावरून एवढी चर्चा होणे हे आश्‍चर्यकारक आहे, असे मत भारताचे दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मांडले.

जडेजाऐवजी बदली खेळाडू देण्यावरून ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू होण्याअगोदर सामनाधिकारी डेव्हिड बून यांच्याशी वाद घातला होतो; परंतु बून यांनी नियमानुसार भारताला बदली खेळाडू वापरण्यास परवानगी दिली.

तुम्ही फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहललाच बदली खेळाडू देण्यावरून प्रश्‍न विचारू शकता. जडेजा जसा अष्टपैलू आहे, तसा अष्टपैलू चहल नाही. एखादा फलंदाज त्याने एक धाव केली असेल किंवा शतक केले असेल; पण फलंदाज जखमी झाल्यावर त्याचा बदली खेळाडू फलंदाजच घेता यायला हवा. यावरून जडेजाऐवजी बदली खेळाडू म्हणून अष्टपैलू खेळाडू घेण्यावरून तुम्ही भांडू शकतो; परंतु बदली खेळाडू मिळणे, हा नियमाचा भाग आहे, असे गावसकर यांचे म्हणणे आहे. ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर जडेजाला चक्कर येत होती, असे विराट कोहलीने सांगितले.

संबंधित बातम्या