फुटबॉलमधील हेराफेरीबाबत पुराव्याचा अभाव जीएफए

PTI
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

गोवा प्रो-लीग स्पर्धेतील सहा सामन्यांबाबत आशियाई फुटबॉल महासंघाला संशय

नवी दिल्ली

आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील सहा सामन्यांबाबत संशय व्यक्त केला आहेमात्र सामना हेराफेरीबाबत पुरेसे पुरावे नसल्याचे गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) म्हटले आहे.

एएफसीने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) नैतिकता अधिकारी जावेद सिराज यांना मार्चमध्ये पत्र पाठवून गोवा प्रो-लीग स्पर्धेतील गतवर्षी १६  ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या सहा सामन्यांतील संशयास्पद हेराफेरीबाबत माहिती दिली होती. या संदर्भात गोवा फुटबॉल असोसिएशनचे सचिव ज्योवितो लोपिस यांनी संदर्भात सामना निकाल निश्चितीचे आरोप पुरेशा पुराव्यांअभावी सिद्ध न झाल्याचे नमूद केले. गोवा लीगमधील सामन्यातील प्रत्येक घटनेचे समालोचन करणाऱ्या गॅब्रिएल फर्नांडिस याला संशयावरून पकडल्याचे आणि चौकशी केल्याची माहिती लोपिस यांनी दिली. कळंगुट असोसिएशनपणजी फुटबॉलर्सगार्डियन एंजल स्पोर्टस क्लबएफसी गोवा (द्वितीय)माजी आय-लीग संघ धेंपो स्पोर्टस क्लब व स्पोर्टिंग क्लब द गोवा या संघांचा समावेश असलेल्या सामन्यांबाबत संशय आहे.

गेल्या ८ मार्च रोजी मडगाव येथे झालेल्या चर्चिल ब्रदर्स आणि गोकुळम केरळा एफसी यांच्यातील सामन्याचे समालोचन करणाऱ्या एका व्यक्तीस रंगेहाथ पकडल्याची माहिती लोपिस यांनी दिली. पत्र मिळाल्यानंतर आम्ही चौकशी सुरू केलीपण त्यात सामना निकाल निश्चिती असल्याचे निष्कर्ष निघू शकला नाही. आमच्यापाशी भक्कम पुरावा नाही. एआयएफएफ आम्हाला पुरावा देऊ शकेल आणि कसून चौकशी करू शकेलअसे लोपिस यांनी सांगितले. आमच्या चौकशीनंतर जीएफएने ९ मार्च रोजी सिराज यांना अहवाल पाठविला आहे आणि एआयएफएफकडून त्यानंतर आम्हाला काहीच कळालेले नाहीअसेही लोपिस यांनी नमूद केले. रंगेहाथ पकडलेल्या संशयास्पद व्यक्तीपाशी एआयएफएफने जारी केलेले जीनियस ग्रुपचा अधिकृत वार्ताहर असल्याचे ओळखपत्र होतेअशी माहितीही लोपिस यांनी दिली.

 बेटिंग ग्रुपशी संबधित

फातोर्डा-मडगाव येथील नेहरू स्टेडियमवर ८ मार्च २०२० रोजी स्टेडियमच्या पश्चिम भागातील एक व्यक्ती सातत्याने मोबाईलवर व्यस्त असून चर्चिल ब्रदर्स आणि (गोकुळम) केरळा एफसी यांच्यातील सामन्याचे समालोचन करत असल्याचे जीएफएचे उपाध्यक्ष अँथनी पांगो यांनी जीएफए सचिवांच्या निदर्शनास आणून दिले होते. जीनियस ग्रुप हा बेट ३६५शी संबंधित असल्यामुळे ऑनलाईन बेटिंगची शक्यता अधिक होतीतथापि या प्रकरणी पुरावा आमच्यापाशी नाहीअसे सांगून जीनियस ग्रुपप्रकरणी एआयएफएफने गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक असल्याचेही लोपिस यांनी स्पष्ट केले. त्या सामन्यातील गंभीर प्रकरण लगेच आय-लीग सामनाधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिल्याची माहितीही त्यांनी दिली. आय-लीग सामन्याच्या वेळेस पकडलेली व्यक्ती तिकीट काढून धुळेर स्टेडियमच्या प्रेक्षक कक्षात बसली होती प्रोफेशनल लीग सामन्याचे समालोचन करत असल्याचे स्टेडियम व्यवस्थाप अँथनी लोबो यांच्या निदर्शनास आले होते. ही बाब आमच्या चौकशीत सिद्ध झाली होतीअसेही लोपिस यांनी सांगितले. सामना निकाल निश्चिती प्रकरणी गोव्यात पोलिस तक्रार नोंद झाली नसल्याचे स्पष्टिकरणही त्यांनी दिले.

 एआयएफएफकडून प्रकरणाची दखल 

खेळातील भ्रष्टाचाराबाबत आमचे शून्य-सहिष्णुता धोरण असल्याचे एआयएफएफने सांगितले आहे. एआयएफएफचे नैतिकता अधिकारी जावेद सिराज स्पोर्टसरडार यांच्याकडून आलेल्या परीक्षण अहवालावर अभ्यास करत आहेतअसे एआयएफएफकडून सांगण्यात आले. गोवा फुटबॉल असोसिएशनच्या गोवा प्रोफेशनल लीगमधील सामना निकाल निश्चिती प्रकरणसंदर्भात आशियाई फुटबॉल महासंघाने स्पोर्टसरडार कंपनी नियुक्ती केली आहे.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या