Asia Cup Update: ना पाकिस्तान, ना भारत, ना दुबई; अश्विन म्हणतो 'या' देशात घ्या आशिया कप

यावेळीही आशिया चषक यूएईमध्ये होणार असल्याची दाट शक्यता आहे.
 Ravichandran Ashwin
Ravichandran AshwinDainik Gomantak

आशिया चषक कुठे होणार याबाबत कोणताही निर्णय अद्याप समोर आलेला नाही, मात्र यावेळीही आशिया चषक यूएईमध्ये होणार असल्याची दाट शक्यता आहे. याबाबत अंतिम निर्णय मार्चमध्ये होणार आहे.

आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानकडे असला तरी भारतीय संघाला पाकिस्तानात जाऊन आशिया कप खेळण्यास उत्सुक नाही. दरम्यान, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने यावर नाराजी व्यक्त करत भारताला दोष दिला आहे.

 Ravichandran Ashwin
Turkey Earthquake: हाजारो मरण पावले पण घानाचा फुटबॉलपटू भूकंपाच्या ढिगाऱ्यात जिवंत सापडला

'भारत चूक करत आहे, जर पाकिस्तानमध्ये येऊन आशिया कप खेळला नाही तर आयसीसीला याबाबत निर्णय घ्यावा लागेल आणि त्यांच्यावर बंदी घालावी.' असे जावेद मियांदाद यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी बोर्डानेही विश्वचषकापासून स्वत:ला वेगळे केल्याची चर्चा आहे.

आशात भारतीय क्रिकेटपटू अश्विनने याबाबत यूट्यूबवर आपले मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानने विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येऊ नये. प्रत्येक वेळी दुबईला जाणारा आशिया चषक यावेळी श्रीलंकेत घेतला जावा असे अश्विनने म्हटले आहे.

 Ravichandran Ashwin
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वीच टीम इंडियाची Playing 11लीक! केएल राहुलचा मोठा खुलासा

'याआधीही पाकिस्तानकडून अशी विधाने येत राहिली की ते भारतात जाणार नाहीत आणि टूर्नामेंट खेळणार नाही. अशा परिस्थितीत स्पर्धा इतरत्र हलवल्या जातात. यावेळी आशिया कप श्रीलंकेत व्हावा, अशी माझी इच्छा आहे. असे अश्विनने म्हटले आहे.

दरम्यान, आशिया कप 2023 सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. अशात अद्याप आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद कोणाला द्यायचे याचा निर्णय झालेला नसून त्याचा निर्णय मार्चमध्ये होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com