आता ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी

आता ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी
आता ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी

लंडन: ट्‌वेन्टी-२० मालिका गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत विजयी सुरुवात केली. मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. हा दुसरा सामनाही जिंकून परतफेड करण्याची संधी ऑस्ट्रेलिया साधणार का, याची उत्सुकता आहे. 

शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात सॅम बिलिंग्जच्या आक्रमक शतकाने सामन्यात रंग भरले; परंतु अखेर सरशी ऑस्ट्रेलियाची झाली. तीन सामन्यांच्या मालिकेतला हा पहिला सामना त्यांनी १९ धावांनी जिंकला.

मिशेल मार्श आणि ग्लेन मॅक्‍सवेल यांच्या शानदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २९४ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानासमोर ४ बाद ५७ अशी अवस्था झालेल्या इंग्लंडने सामना अखेरपर्यंत रंगतदार केला. सॅम बिलिग्जने ११० चेंडूत ११८ धावांची खेळी केली. त्याअगोदर बेअरस्टॉने ८४ धावांचे योगदान दिले; परंतु ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर ॲडम झॅम्पाची प्रभावी फिरकी निर्णायक ठरली. 

मधल्या फळीची कमाल
दोन्ही संघांच्या डावाचा उत्तरार्थ कलाटणी देणारा ठरला. नव्या चेंडूवर दोन्ही संघाचे सुरुवातीचे फलंदाज अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. अपवाद मात्र इंग्लंडच्या बेअरस्टॉचा. ऑस्ट्रेलियाची तर ५ बाद १२३ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मिशेल मार्श आणि ग्लेन मॅक्‍सवेल यांनी सहाव्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली त्यामुळे कांगारूंना तीनशे धावांच्या जवळ जाता आले. इंग्लंडचीही ४ बाद ४७ अशी घसरगुंडी उडाली होती. त्यानंतर बेअरस्टॉ आणि बिलिग्ज यांनी पाचव्या विकेटसाठी ११३ धावांचो योगदान दिले.

इंग्लंडचे जेसन रॉय, ज्यो रूट आणि हुकमी जोस बटलर एकेही धावात बाद झाले त्याचा फटका त्यांना बसला. इंग्लंडने जिंकलेल्या ट्‌वेन्टी-२० मालिकेत बटलर दोन्ही संघातला फरक ठरला होता. 

संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया ः ५० षटकांत ९ बाद २९४ (मार्कस स्टॉनिस ४३ -३४ चेंडू, ६ चौकार; मिशेल मार्श ७३ -१०० चेंडू, ६ चौकार; ग्लेन मॅक्‍सवेल ७७ - ५९ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार; जोफ्रा आर्चर ५७-३, मार्क वूड ५४-३) वि. वि. इंग्लंड ः ५० षटकांत ९ बाद २७५ (बेअरस्टॉ ८४ -१०७ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार; सॅम बिलिंग्ज ११८ -११० चेंडू, १४ चौकार, २ षटकार; हॅझलवूड २६-३, झॅम्पा ५५-४)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com