आता इंझमामने देखील खेळपट्टीवरुन दिली प्रतिक्रिया

आता इंझमामने देखील खेळपट्टीवरुन दिली प्रतिक्रिया
Now Inzamam also reacted from the pitch

भारत – इंग्लड यांच्यात अखेरच्या कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली. मात्र तिसरा कसोटी सामना दोनच दिवसांमध्ये कसा संपला याची चर्चा क्रिकेट जगतात चांगलीच रंगली आहे. तिसऱ्या कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम खेळला गेला. याच दरम्यान खेळपट्टीवरुन जगातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी शंका उपस्थीत केली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक यानेही खेळपट्टीवरुन अनेक प्रश्न उपस्थीत केले आहेत. आयसीसीने खेळपट्टीवर कारवाई कराय़ला पाहिजे असं इंझमाम म्हणाला.

''कोणीही विचार केला नसेल आणि मला अद्याप आठवतही नाही की शेवटचा कसोटी सामना दोनच दिवसांमध्ये कसा संपला असेल. भारताने कसोटी सामन्या दरम्यान उत्तम प्रदर्शन केलं की, हा खेळपट्टीचा परिणाम होता? अशाप्रकारच्या खेळपट्ट्या कसोटी सामन्य़ासाठी तयार कराव्यात का? मला वाटलं भारत दमदार प्रदर्शन करतोय़ त्यांनी ऑस्ट्रेलियात दुसऱ्या कसोटी सामन्या दरम्यान ऑस्ट्रेलिय़ाला पराजीत केलं होत... मात्र अशाप्रकारच्या खेळपट्ट्या तयार करणं हे क्रिकेटसाठी उत्तम नाही,'' असं मला वाटतं असं पाकिस्तानी कर्णधार इंझमाम उल हक यांनी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हटलं आहे.

''अहमदाबादमधील कसोटी सामन्य़ातील धावसंख्येपेक्षा टी 20 सामन्यातील धावसंख्य़ा चांगली असते. अशी कोणत्या प्रकारची खेळपट्टी आहे की, जिथे कसोटी सामना अगदी दोनच दिवसात आटोपला जातो... विशेष म्हणजे एकाच दिवसामध्ये 17 विकेट पडतात.. आयसीसीने या सगळ्या प्रकारावर कारवाई करायला पाहिजे. तुम्ही घरच्या परिस्थीतीचा फायदा घेण्यासाठी फिरकीसाठी आवश्य़क असणाऱ्या खेळपट्ट्या जरुर बनवाव्य़ात परंतु अशा प्रकारच्या खेळपट्ट्या बिलकुल नसाव्यात. ज्या खेळपट्टीवर इंग्लंडचा कप्तान गोलंदाजी करत 8 धावा देतो आणि 5 बळी घेतो तर दुसरीकडे भारताचा ऑफ स्पिनर गोलंदाज रवीचंद्रन अश्वीन आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीचं कौतुक करायचं? कसोटी सामना हा कसोटी सामन्यासारखा झाला पाहिजे. मला वाटत नाही की, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला पराजीत करून जे समाधान मिळालं होतं तेच समाधान इंग्लडला पराजीत करुन मिळालं असेल,'' असंही इंझमाम उल हक म्हणाला.     
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com