गोव्यातील लेव्हल वन क्रिकेट प्रशिक्षकांची संख्या वाढणार

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (GSA) प्रयत्नामुळे लवकरच राज्यातील लेव्हल वन क्रिकेट प्रशिक्षकांची संख्या वाढणार आहे

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (GSA) प्रयत्नामुळे लवकरच राज्यातील लेव्हल वन क्रिकेट प्रशिक्षकांची संख्या वाढणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) बंगळूरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा ऑनलाईन अभ्यासक्रम 19 गोमंतकीयांनी पूर्ण केला असून त्यांना प्रात्यक्षिकाची प्रतीक्षा आहे. कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीमुळे प्रशिक्षकांचा लेव्हन वन ऑनलाईन अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने गेल्या वर्षी 7 ते 12 डिसेंबर या कालावधीत एनसीएतर्फे खास गोमंतकीय प्रशिक्षकांसाठी घेण्यात आला. (The number of level one cricket coaches in Goa will increase)

वर्ल्ड टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघ जाहीर; निवड समितीकडून मोठे बदल

प्रशिक्षक बनू इच्छिणारे सर्व 19 जण गोव्याचे आजी-माजी क्रिकेटपटू आहेत. या सर्वांची प्रात्यक्षिक परीक्षा मे महिन्यात अपेक्षित होती, पण ती आता कोरोना विषाणू महामारी उद्रेकामुळे लांबणार आहे हे नक्की असून या परीक्षेनंतर गोमंतकीय प्रशिक्षकांच्या लेव्हल वन पात्रतेवर शिक्कामोर्तब होईल. लेव्हल वन अभ्यासक्रमात सामील झालेल्या गोमंतकीयांत 14 पुरुष व 5 महिला आहेत. गोव्यातील लेव्हल वन प्रशिक्षकांची संख्या वाढल्यानंतर राज्यातील प्रशिक्षणाचा दर्जा वाढविणे जीसीएला शक्य होणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात या प्रशिक्षकांना नेमून ग्रामीण भागातील गुणवत्तेला मार्गदर्शनाची संधी देण्याचा जीसीएचा विचार असल्याचे सूत्राने सांगितले.

‘आयपीएल’ मधील सट्टेबाजांचा पर्दाफाश

सध्या जीसीएच्या सेवेत लेव्हल वन दर्जाचे तीन प्रशिक्षक आहेत. यामध्ये जीसीएचे प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर, महिला प्रशिक्षक अनुराधा रेडकर, सर्वेश नाईक यांचा समावेश आहे. हल्लीच बीसीसीआयने 75 पेक्षा जास्त प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या क्रिकेटपटूंना थेट लेव्हल टू प्रशिक्षक अभ्यासक्रमात सामावून घेतले आहे, त्यात गोव्याचे माजी कर्णधार स्वप्नील अस्नोडकर, सगुण कामत, शदाब जकाती यांचा समावेश आहे.

 

संबंधित बातम्या