पैगंबर विवाद: भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शोएब अख्तरने घेतला समाचार

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नेते नवीन जिंदाल यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले.
पैगंबर विवाद: भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शोएब अख्तरने घेतला समाचार
Shoaib Akhtar Dainik Gomantak

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने ( BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नेते नवीन जिंदाल यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारत सरकारचे कौतुक केले आहे. शोएब अख्तरने ट्विटरच्या माध्यमातून आपले मत नोंदवले आहे. (Nupur Sharma Naveen Jindal Prophet Muhammad Controversy Shoaib Akhtar Tweet)

Shoaib Akhtar
ऑस्ट्रेलियाने खचून जाऊ नये: शोएब अख्तर

शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) म्हटले की, 'प्रेषित मुहम्मद यांचा आदर आमच्यासाठी सर्वस्व आहे. आपले जगणे, मरणे आणि आपण जे काही करतो ते फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहेत. परंतु प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो. अशाप्रकारे लज्जास्पद वक्तव्य करणाऱ्यांना निलंबित करण्याच्या भारत (India) सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. भारत सरकारने अशा लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजीही घ्यावी.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com