NZ vs BAN: न्युझीलंडच्या भूमीवर बांग्लादेशने तोडला 10 वर्षांचा रेकॉर्ड

न्युझीलंडच्या भूमीवर कसोटी सामना जिंकणे ही कोणत्याही परदेशी संघासाठी मोठी गोष्ट असते.
NZ vs BAN: Bangladesh breaks 10-year record on New Zealand place

NZ vs BAN: Bangladesh breaks 10-year record on New Zealand place

Dainik Gomantak 

न्युझीलंड भूमीवर कसोटी सामना जिंकणे ही कोणत्याही परदेशी संघासाठी मोठी गोष्ट असते. गेल्या 10 वर्षात भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यासारख्या आशियाई संघांनी येथे एकही कसोटी जिंकली नाही, परंतु बांग्लादेशने ही मालिका खंडित केली आहे. बांग्लादेशने बे ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत टीमचे आठ गडी राखून पराभव करून ही 10 वर्षे जुनी मालिका खंडित केली. गेल्या 10 वर्षात न्युझीलँडमध्ये केवळ दोनच कसोटी संघ विजयाची नोंद करू शकले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशिवाय, गेल्या 10 वर्षात इतर कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर न्युझीलंडचा पराभव करता आला नाही.

गेल्या 10 वर्षात न्यूझीलंडने घरच्या मैदानावर एकूण 40 कसोटी सामने खेळले आहेत आणि या कालावधीमध्ये केवळ पाच वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. न्युझीलँडचा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून दोनदा पराभव झाला आहे, तर बांग्लादेशने एकदा ही कामगिरी केली आहे. इंग्लंडने (England) गेल्या 10 वर्षात न्युझीलंडमध्ये सर्वाधिक कासोटी सामने खेळले आहेत, परंतु त्यापैकी एकही कसोटी सामना जिंकलेला नाही, तर श्रीलंकेने (Sri-lanka) गेल्या 10 वर्षात न्युझीलंडच्या भूमीवर सहा वेळा कसोटी सामने खेळले आहेत, परंतु एकही सामना जिंकलेला नाही. न्युझीलँडमध्ये गेल्या 10 वर्षात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी प्रत्येकी चार कसोटी सामने खेळले आहेत, परंतु हे दोन्ही संघ विजयापासून दूर राहिले.

<div class="paragraphs"><p>NZ vs BAN: Bangladesh breaks 10-year record on New Zealand place</p></div>
BBL वरती कोरोनाचे काळे ढग, ऑस्ट्रेलियाच्या 'या' क्रिकेटरला कोरोनाची लागण

भारताने (India) एक मॅच ड्रॉ केली, तर पाकिस्तानने चारही सामने गमावले. श्रीलंकेने सहापैकी पाच सामने जिंकले, तर एक सामना ड्रॉ करण्यात आला. इंग्लंडबद्दल सांगायचे झाले तर त्याची कामगिरी या आशियाई संघापेक्षा सरस होती. इंग्लंडने गेल्या 10 वर्षात न्युझीलंडच्या भूमीवर एकही कसोटी हारली नाही. ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी खेळल्या आणि दोन्ही पण जिंकल्या आणि चार सामने ड्रॉ करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com