ISL 2020-21 : तळातील ओडिशाची गाठ केरळा ब्लास्टर्सशी

दैनिक गोमन्तक
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

ओडिशा एफसी सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तळाच्या अकराव्या, तर केरळा ब्लास्टर्स दहाव्या क्रमांकावर आहे.

पणजी : ओडिशा एफसी सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तळाच्या अकराव्या, तर केरळा ब्लास्टर्स दहाव्या क्रमांकावर आहे. त्यांच्यात गुरुवारी (ता. 11) होणाऱ्या लढतीत नामुष्की टाळण्यावर भर असेल.

ICC Test Rankings : जो रूटची तिसऱ्या स्थानी झेप; तर कोहलीची घसरण 

ओडिशा व केरळा ब्लास्टर्स यांच्यातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. ओडिशाचे आव्हान खूप पूर्वी संपुष्टात आले आहे. आता बाकी पाच लढतीतून मिळणाऱ्या गुणांद्वारे तळाचे स्थान टाळण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतील. त्यांच्या खाती 15 लढतीतून फक्त आठ गुण आहेत. स्पर्धेत सर्वाधिक नऊ पराभव त्यांनी स्वीकारले आहेत. केरळा ब्लास्टर्स प्ले-ऑफ फेरीच्या शर्यतीतून बाद झाल्यातच जमा आहे. 16 लढतीनंतर त्यांचे 15 गुण आहेत. यंदा स्पर्धेत सर्वाधिक 27 गोल स्वीकारण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.

INDvsENG 'जो रूट'ला टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऑटोग्राफ केलेली जर्सी का...

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात बांबोळी येथे ओडिशा एफसीने केरळा ब्लास्टर्सला 4 - 2 फरकाने हरविले होते. भुवनेश्वरच्या संघाने स्पर्धेत नोंदविलेला हा एकमेव विजय आहे. त्या पराभवाचा वचवा काढण्याची संधी केरळा ब्लास्टर्स गुरुवारी साधू शकतो. india india 

संबंधित बातम्या