
Premier League Cricket Tournament : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पर्वरी येथील जीसीए मैदानावर पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. एमसीसी व पणजी जिमखाना यांच्यातील सामन्याच्या पहिल्या दिवशी 18 गडी बाद झाले.
युवा फलंदाज शंतनू नेवगी याच्या शैलीदार फलंदाजीच्या बळावर एमसीसीने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 179 धावा केल्या. शंतनूने 107 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. शुभम देसाई, मनीष काकोडे व राहुल मेहता यांनी एकत्रित नऊ गडी बाद केले.
एमसीसीने अखेरच्या सहा विकेट 34 धावांत गमावल्या. दिवसअखेर पणजी जिमखान्याने 8 बाद 142 धावा केल्या असून ते अजून 37 धावांनी मागे आहेत. एमसीसीचे फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ, कीथ पिंटो व वेदांत नाईक यांनी एकत्रित सात गडी टिपले.
अमोघ, दीपराज यांची शानदार शतके
सांगे येथे स्पर्धेतील आणखी एका सामन्यात वेदांत नाईक व दीपराज गावकर यांच्या शतकाच्या बळावर साळगावकर क्रिकेट क्लबने चौगुले स्पोर्टस क्लबविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ४ बाद 286 धावा केल्या.
अमोघने 196 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 107 धावा केल्या. दिवसअखेर नाबाद असलेल्या दीपराजने आक्रमक शतक ठोकले. त्याने ९३ चेंडूंत ११ चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या. अमोघ व आदित्य सूर्यवंशी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक
पर्वरी मैदानावर : एमसीसी, पहिला डाव
46 षटकांत सर्वबाद 179 (शंतनू नेवगी 80, शौर्य जगलान 17, दिगेश रायकर 24, शुभम तारी 1-19, शुभम देसाई 2-43, मनीष काकोडे 3-61, राहुल मेहता 4-12) विरुद्ध पणजी जिमखाना, पहिला डाव : 42 षटकांत 8 बाद 142 (राहुल मेहता 23, राजशेखर हरिकांत 34, मनीष काकोडे 21, हेरंब परब नाबाद 22, दर्शन मिसाळ 3-47, कीथ पिंटो 3-37, वेदांत नाईक 1-32).
सांगे मैदानावर : साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव : 82 षटकांत 4 बाद 268 (अमोघ देसाई 107, आदित्य सूर्यवंशी 44, दीपराज गावकर नाबाद 102, मोहित रेडकर 1-98, जगदीश पाटील 1-45, सचिन मिश्रा 1-24).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.