ENG vs IND: टीम इंडियातील आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण

गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल यांना मुख्य प्रशिक्षकासह विलगीकरणात ठेवण्यात आले.
ENG vs IND: टीम इंडियातील आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण
Team IndiaDainik Gomantak

ENG vs IND: सध्या इंग्लंड (England) दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत असलेल्या टीम इंडियासाठी (Team India) आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संघातील आणखी एक सदस्याला कोरोनाची लागण (Covid19) झाल्याचे आढळून आले आहे. संघ सध्या मँचेस्टरमध्ये आहे जिथे त्यांना मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे. या कारणास्तव, संघाने गुरुवारी दुपारी त्यांचे सराव सत्र रद्द केले. तत्पूर्वी, संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील कोविड पॉझिटिव्ह आढळले, त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल यांना मुख्य प्रशिक्षकासह विलगीकरणात ठेवण्यात आले.

Team India
ENG vs IND: भारताला 13 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मालिका विजयाची संधी

दरम्यान, नंतर असे आढळून आले की, अरुण आणि श्रीधर (Sridhar) यांच्या कोरोना चाचण्या देखील पॉझिटिव्ह आल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, टीम इंडियाचे दुसरे फिजिओ योगेश परमार (Physio Yogesh Parmar) यांना कोरोनाची झाल्याचे आढळून आले आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार, बुधवारी संध्याकाळी झालेल्या कोविड चाचणीमध्ये सर्वात अलीकडे कोरोनाची लागण समोर आले आहे. संघाने बुधवारी सकाळी सराव केला होता. यानंतर संपूर्ण टीमची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट गुरुवारी सकाळी आला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवारपासून सुरु होत आहे. या सामन्यापूर्वी भारतासाठी ही एक धक्कादायक बातमी आहे. भारत मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

Team India
ENG vs IND: पाचव्या कसोटी सामन्यासाठी जार्वोचा नवा प्लान तयार

शास्त्रींना अशी लागण झाली!

त्याचवेळी, भारतीय संघाचे खेळाडू शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी झालेल्या दोन रैपिड एंटीजन टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. सहाय्यक कर्मचारी आणि सर्व खेळाडूंना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. अशी शक्यता आहे की, शास्त्रींनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी टीम हॉटेलमध्ये बाहेरचे पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यावेळी शास्त्रींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. पटेल, श्रीधर आणि अरुणही त्या कार्यक्रमास उपस्थित होते. त्याच वेळी, हे कळले आहे की हे तिघेही मँचेस्टरला जाणार नव्हते, हे आधीच ठरलेले होते. सूत्राने सांगितले, “बीसीसीआय क्रिकेटपटूंसाठी स्वतंत्र आयपीएल बबल तयार करत आहे आणि ते 15 सप्टेंबरला बबलमधून बबलमध्ये प्रवेश करतील. तो पूर्वनिर्णय होता.

Team India
ENG vs IND: पाचव्या कसोटीत अजिंक्यला डच्चू, बुमराहला विश्रांती, अश्विन संधी?

अलिकडच्या काळात ही दुसरी मालिका आहे, जेव्हा भारतीय संघाशी संबंधित लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातही कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर भारताचे आठ खेळाडू मालिकेबाहेर रहावे लागले होते.

चौथ्या कसोटी सामन्यात विजय

चौथ्या सामन्यात इंग्लंडला 157 धावांनी पराभूत केल्यानंतर भारताने पुन्हा एकदा मालिकेत आघाडी घेतली. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी शास्त्रींना कोरोनाची लागण झाली. पुढील कसोटी सामन्यात भारत आपली आघाडी कायम राखत मालिका जिंकण्याच्या इराद्याने जाईल, तर इंग्लंड मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर परतून मालिका बरोबरीत साधून आपल्याच देशात पराभव टाळण्याचा प्रयत्न करेल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com