इंटरनेट यंत्रणा क्रॅश झाल्यामुळे रशियासह भारत बुद्धिबळाचा जागतिक विजेता

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

रशियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातील पहिल्या लढतीच्यावेळी विश्‍वनाथन आनंदने ब्रेक घेतला. त्यानंतरही भारताने ही लढत ३-३ बरोबरीत सुटली. दुसऱ्या लढतीतील विश्‍वनाथन आनंद, विदीत गुजराती आणि द्रोणावली हरिकाच्या लढती बरोबरीत सुटल्या होत्या.

मुंबई: कोरोना आक्रमणाने भारतीय त्रस्त असताना राष्ट्रीय बुद्धिबळ संघाने देशवासीयांना जागतिक विजेतेपदाचा आनंद दिला. सर्व्हर क्रॅश झाल्याचा भारतीय संघास फटका बसला असे वाटत असतानाच विश्‍वनाथन आनंद आणि सहकाऱ्यांनी केलेले अपील ग्राह्य धरण्यात आले आणि भारत तसेच रशियाला संयुक्त विजेतेपद देण्यात आले. यामुळे भारताने प्रथमच जागतिक बुद्धिबळाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. 

रशियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातील पहिल्या लढतीच्यावेळी विश्‍वनाथन आनंदने ब्रेक घेतला. त्यानंतरही भारताने ही लढत ३-३ बरोबरीत सुटली. दुसऱ्या लढतीतील विश्‍वनाथन आनंद, विदीत गुजराती आणि द्रोणावली हरिकाच्या लढती बरोबरीत सुटल्या होत्या. मात्र याचवेळी सर्व्हर क्रॅश झाला. त्यामुळे दिव्या देशमुख, निहाल सरीन, कोनेरू हंपीला चालीच करणे अशक्‍य झाले. भारताचा उपकर्णधार श्रीनाथ तसेच विश्‍वनाथन आनंदने जागतिक महासंघाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आणि अखेर तक्रारही केली. 

दरम्यान, भारतातील प्रथितयश कंपन्यांनी सर्व्हर क्रॅश झाल्याची तक्रार केली. तांत्रिक भाषेत बोलायचे झाले तर भारतात क्‍लाऊडफ्लेअर क्रॅश झाला. त्यामुळे एक कोटीहून जास्त जणांचे वाय-फाय खंडित झाले. याचा फटका भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांना बसला. त्यामुळे भारताचे अपील स्वीकारले गेले. अनेक संकेतस्थळांच्या माध्यमातून चाहत्यांना आपला सर्व्हर क्रॅश झाल्याची तक्रार केली. तसेच इ-मेलही जागतिक महासंघास पाटवले. अखेर जागतिक बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष आर्कडी द्वोर्कोविच यांनी भारत तसेच रशियास संयुक्त विजेते असल्याचे जाहीर केले. 

इंटरनेट क्रॅश झाल्याचा फटका बसल्याचे भारताने सांगितल्यावर प्रतिकुल प्रतिक्रियाही उमटल्या. आर्मेनियानेही हीच तक्रार केली होती, याची आठवण करून दिली होती, पण इंटरनेटचा प्रश्‍न जागतिक असल्याने भारतास न्याय देण्यात आला. रशियाची भूमिका महत्त्वाची होती. मात्र जागतिक महासंघाचे अध्यक्ष रशियाचे असल्याने प्रश्‍न जास्त चिघळला नाही.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या