Operation Blue Star: "अभिमानाने जगा, धर्मासाठी मरा", हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिल्यानं भज्जी ट्रोल

Cricketer Harbhajan Singh
Cricketer Harbhajan Singh

Operation Bluestar: ऑपरेशन ब्ल्यू स्टार(Operation Bluestar) दरम्यान सुवर्ण मंदिरात ठार झालेल्या खलिस्तानी दहशतवादी जरनैलसिंह भिंडरावाले(Jarnail Singh Bhindranwale) आणि इतरांना भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने श्रद्धांजली वाहिली. हरभजनसिंगने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करून त्याला 'शहीद' म्हणण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी त्याने भिंडरावाले यांचे नाव स्पष्टपणे दिले नाही.(Indian Cricketer Harbhajan Singh paid tribute to Khalistani terrorist Bhindranwale)

ऑपरेशन ब्लू स्टार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार जून 1984 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात करण्यात आले होते. हे ऑपरेशन भारतीय लष्कराने केले होते. या ऑपरेशनचे उद्दीष्ट शिख समुदायासाठी सार्वभौम राज्य निर्माण करू इच्छिणाऱ्या भिंडरावाले यांच्या नेतृत्वात दहशतवाद्यांचा खात्मा करणे हा होता. 

ऑपरेशन ब्लूस्टारच्या या कारवाइबद्दल हरभजन सिंग यने पोस्ट केलेले फोटो 'शहीदांना सलाम' या मथळ्यापासून सुरू होते. पंजाबी भाषेत लिहिलेल्या या फोटोमध्ये लिहिले आहे की, “1 जून 1984 रोजी श्री हरमंदिर साहिबच्या आत ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली”. या सोबतच त्या फोटोवर 'अभिमानाने जगा, धर्मासाठी मरा,' असे लिहिले आहे.

टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने आता गोलंदाजी सोडली आणि स्वयंपाकाच्या क्षेत्रात उतरला आहे. हरभजनने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्वयंपाक करताना दिसत आहे. भज्जीने स्वयंपाकघरात आपलं टॅलेन्ट दाखवलं हे पहिल्यांदाच घडलं असं नाही, यापूर्वीही त्यांने स्वयंपाक करतांनाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यावर्षी आयपीएल 2021 मध्ये हरभजन कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसला होता. 

शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये हरभजन सिंग छोले बनवताना दिसत आहे. हरभजन ज्या पद्धतीने स्वयंपाक करताना दिसतो ते पाहून जणू आंतरराष्ट्रीय क्रिकेटसारखाच त्याला स्वयंपाकाचा अनुभव आहे अस दिसून येत आहे. यावर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमात हरभजन केकेआरकडून खेळताना दिसला. भज्जीने संघासाठी संघ सामने खेळले होते, परंतु एकही विकेट घेण्यात त्याला यश आले नाही. केकेआरने हरभजनला त्याच्या बेस किंमतीवर विकत घेतले. 

हरभजन सिंग पूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा भाग होता आणि त्याच्याकडून दोन वर्षे खेळला. आयपीएल 2020 मध्ये ऑफ स्पिनरने वैयक्तिक कारण सांगून या स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर आयपीएल 2021 च्या लिलावापूर्वी सीएसके संघाने त्याला रीलीज केले होते. हरभजन हल्ली हिंदी कॉमेंट्री मध्ये किस्मत आजमावतांना दिसत आहे. आणि एक एक्सपर्ट म्हणून तो भारताच्या सामन्याबाबत सल्ला देतानाही दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com