आरसीबीला प्लेऑफची संधी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

दोन दिवसांपूर्वी मुंबईकडून पराभूत झालेल्या पराभवामुळे लय बिघडलेल्या बंगळूर संघाचा उद्या हैजराबादविरुद्ध सामना होत आहे. हा सामना जिंकून प्लेऑफ जवळपास निश्‍चित करण्याची संधी बंगळूरला आहे, तर आव्हान कायम ठेवण्यासाठी हैदराबादलाही विजय आवश्‍यकच आहे. 

शारजा:  दोन दिवसांपूर्वी मुंबईकडून पराभूत झालेल्या पराभवामुळे लय बिघडलेल्या बंगळूर संघाचा उद्या हैजराबादविरुद्ध सामना होत आहे. हा सामना जिंकून प्लेऑफ जवळपास निश्‍चित करण्याची संधी बंगळूरला आहे, तर आव्हान कायम ठेवण्यासाठी हैदराबादलाही विजय आवश्‍यकच आहे. 

बंगळूर सध्या दुसऱ्या तर हैदराबाद सहाव्या स्थानावर आहेत, क्रमवारीतील हा मोठा फरक असला तरी उद्या मैदानात मात्र तसे चित्र नसेल. हैदराबादकडे डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन असे निष्णांत फलंदाज आहेत, परंतु या दोघांना एकत्रित मिळून कामगिरी करता आलेली नाही.आता त्यांच्यासाथीला जेसन होल्डर आला आहे त्यामुळे बंगळूरसाठी ही लढाई सोपी नसेल.

हैदराबादच्या वृद्धिमन साहाने गेल्या सामन्यात जबरदस्त खेळी करून संघाचाही आत्मविश्वास उंचावलेला आहे. बंगळूरची फलंदाजी देवदत्त पदिक्कल, विराट कोहली आणि एबी डिव्हिल्यर्स यांच्यावर अवलंबून आहे हे सिद्ध झाले आहे. मुंबईविरुद्ध पदिक्कलने शानदार अर्धशतक 
केले.

संबंधित बातम्या