त्रिशा, खुशाल, अंशुमनला दुहेरी किताब

महिलांत लिओमा, तर पुरुष एकेरीत धीरजला विजेतेपद
त्रिशा, खुशाल, अंशुमनला दुहेरी किताब
टेबल टेनिस (Table Tennis) स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांसमवेत मान्यवरDainik Gomantak

Panaji: रोटरी जीनो अखिल गोवा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत (All Goa Rating Table Tennis Tournament) त्रिशा वेर्लेकर, खुशाल नाईक, अंशुमन अगरवाल यांनी दुहेरी किताब पटकाविला. स्पर्धा पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियममधील टेबल टेनिस हॉलमध्ये (Peddem- Mapusa Indoor stadium) झाली. रोटरी क्लब म्हापसा यांनी गोवा टेबल टेनिस संघटना आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने स्पर्धा घेतली. महिला एकेरीत लिओमा फर्नांडिसने, तर पुरुष एकेरीत धीरज राय याने विजेतेपद मिळविले.

टेबल टेनिस (Table Tennis) स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांसमवेत मान्यवर
रॅपिड बुद्धिबळात एथन वाझ अजिंक्य

बक्षीस वितरण जीनो फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप साळगावकर, स्पर्धा प्रमुख सचिन मेणसे, रोटरी क्लब म्हापसाचे अध्यक्ष सिद्धेश कोटकर, रॉटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अमेय वरेरकर, गोवा टेबल टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष विष्णू कोलवाळकर यांच्या उपस्थितीत झाले.

टेबल टेनिस (Table Tennis) स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांसमवेत मान्यवर
श्रृंगी, संजना, झेवियर, झिदानचे जलतरणात यश

अंतिम निकाल: ११ वर्षांखालील मुलगे: चंदन कारे वि. वि. ध्रुव कामत, मुली: ईशिता कुलासो वि. वि. अनाया श्रीवास्तव. १३ वर्षांखालील मुलगे: खुशाल नाईक वि. वि. रिशान शेख, मुली: त्रिशा वेर्लेकर वि. वि. रुची कीर्तनी.

१५ वर्षांखालील मुली: लिओमा फर्नांडिस वि. वि. त्रिशा वेर्लेकर, मुलगे: खुशाल नाईक वि. वि. ॲरोन फारियास, १७ वर्षांखालील मुली: गाल्या फर्नांडिस वि. वि. लिओमा फर्नांडिस, मुलगे: अंशुमन अगरवाल वि. वि. खुशाल नाईक, १९ वर्षांखालील मुली: त्रिशा वेर्लेकर वि. वि. ऊर्वी सुर्लकर, मुलगे: अंशुमन अगरवाल वि. वि. खुशाल नाईक.

महिला एकेरी: लिओमा फर्नांडिस वि. वि. गाल्या फर्नांडिस, पुरुष एकेरी: धीरज राय वि. वि. अंशुमन अगरवाल.

व्हेटरन्स सांघिक दुहेरी: विजेता संघ: दीपक गोपानी, संजीव अफझलपूरकर, विनय रायकर, काशिनाथ खलप, तनय कैसरे, उपविजेता संघ: अमित नाईक, प्रवीण गाड, रोहित गाड, कुलदीप, विकास प्रभू, तिसरा क्रमांक: नीरज कन्नुरे, रत्नदीप शिवानी, एम. अँथनी, सदानंद आरोलकर, प्रशांत कामत.

Related Stories

No stories found.