'आमची खेळी चांगली नाही, तयारीची गरज': रोहित शर्मा

MI vs PBKS: 'परत जाऊन चांगल्या तयारीने परत येण्याची गरज' असल्याचे रोहित शर्माने म्हटले आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) बुधवारी रात्री IPL 2022 मधील सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या (Punjab Kings) सामन्यात एमआयला 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबईच्या या निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, आम्ही चांगले क्रिकेट खेळत नाही आहोत. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने मुंबईसमोर 199 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, ज्यासमोर संघाला निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 186 धावा करता आल्या होत्या. (Our game is not good we need preparation Rohit Sharma)

Rohit Sharma
गोवा क्रिकेटअसोसिएशन स्पर्धेत तरवळे क्लब उपांत्य फेरीत दाखल

मुंबई इंडियन्सच्या या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने नो पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये सांगितले आहे की, "खेळ संपण्याच्या अगदी जवळ आल्यावर, काही रन आऊटमुळे आम्हाला फायदा झाला नाहीये. उत्तरार्धात चांगली गोलंदाजी करण्याचे पुर्ण श्रेय पंजाबला जाते. आम्ही विचार प्रक्रियेशी खेळण्याचा प्रयत्न करत आहोत पण ते चांगले काम करत नाहीत. मला अशा लोकांचे श्रेय घ्यायचे नाही जे चांगले खेळले आणि पंजाबने आज ते केले आहे. "तो पुढे म्हणाला, "आम्ही चांगले क्रिकेट खेळत नाही आहोत, आम्हाला परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार यावेळी वागण्याची गरज आहे. आमच्या गोलंदाजांवर दबाव होता पण खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती आणि मला वाटले की 198 धावांचा पाठलाग करता येईल, जसे मी आधी म्हटल्याप्रमाणे, आम्हाला हे करणे आवश्यकच आहे. परत जाऊन चांगल्या तयारीने परत येण्याची गरज आहे."

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 16 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळला जाणार आहे. तिथेही मुंबईला विजयाची नोंद करता आली नाहीये, तर प्लेऑफचा रस्ता त्यांच्यासाठी कठीण होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात आजपर्यंत एकही संघ सुरुवातीच्या काळात इतके सामने गमावून प्लेऑफमध्ये पोहोचलेला नाहीये.

Rohit Sharma
IPL 2022: मुंबई इंडियन्सला मिळणार नवा कर्णधार?

पंजाबविरुद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला. स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार रोहित शर्माला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आणि प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित खेळाडूंना 6 लाख किंवा मॅच फीच्या 25 टक्के, यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला असल्याचे समोर आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com