IPL2022: काश्मिरी टॅलेंटवर पी. चिदंबरम 'फिदा', म्हणाले, टीम इंडियात स्थान द्या

राजकारण्यांनाही उमरानच्या गोलंदाजीचे कौतूक
IPL2022: काश्मिरी टॅलेंटवर पी. चिदंबरम 'फिदा', म्हणाले, टीम इंडियात स्थान द्या
P Chidambaram Umran MalikDainik Gomantak

जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामात आपल्या ज्वलंत गोलंदाजीने कहर करत आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाच्या गोलंदाजाने बुधवारी गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध जोरदार गोलंदाजी करताना 5 बळी घेतले. (P Chidambaram Umran Malik)

उमरानने IPLच्या चालू मोसमात आतापर्यंत 150 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली आहे. त्याचे चाहते केवळ क्रिकेटप्रेमी आणि दिग्गजच नव्हे, तर राजकारणीही झाले आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यानंतर आता पी चिदंबरम यांनी उमराणचे जोरदार कौतुक केले आहे. ते म्हणाले की, हे ते एक वेगवान वादळ आहे, जे त्याच्यामध्ये येणारे सर्व अडथळे उडवून टाकते.

P Chidambaram Umran Malik
9 चेंडूत 42 धावा, मग हा 21 वर्षीय 'करोडपती' फलंदाज बनला संघाचे रन मशीन

'उमरानला प्रशिक्षक देऊन टीम इंडियात आणा'

चिदंबरम यांनी ट्विटमध्ये लिहिले- 'हे ते एक वेगवान वादळ आहे, जे त्याच्यामध्ये येणारे सर्व अडथळे उडवून टाकते. त्याचा वेग आणि आक्रमकता पाहण्यासारखी आहे. त्याची आजची कामगिरी पाहिल्यानंतर आयपीएलच्या या मोसमातील हा सर्वात मोठा शोध आहे यात शंका नाही. बीसीसीआयने (BCCI) त्याला विशेष प्रशिक्षक देऊन ताबडतोब टीम इंडियात आणावे,' असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

'इंग्लंड दौऱ्यावर उमरान ब्रिटिशांना हादरवणार'

याआधी शशी थरूर यांनीही उमरानचे ट्विट करून कौतुक केले होते आणि त्याला टीम इंडियात आणण्याचे सुचवले होते. थरूर म्हणाले होते - 'आम्हाला त्या खेळाडूला भारतीय जर्सीमध्ये बघायचे आहे. तो कुठेतरी हरवण्यापूर्वी त्याला मदत करा. त्याला इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी न्या. तो आणि जसप्रीत बुमराह मिळून ब्रिटिशांना घाबरवतील. '

उमरानने गुजरातविरुद्धच्या सामन्यात 5 महत्त्वाच्या विकेट घेतल्या आहेत. त्याने ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांना बळी बनवले. उमरानने सामन्यात 4 षटके टाकत 25 धावांत 5 विकेट घेतल्या.

P Chidambaram Umran Malik
IPL 2022: सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा परदेशी खेळाडू कोण?

जीटीने SRH विरुद्धचा सामना 5 गडी राखून जिंकला

या सामन्यात गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने 6 गडी गमावून 195 धावा केल्या. अभिषेक शर्माने 65 आणि एडन मार्करामने 56 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने 5 गडी गमावून 199 धावा केल्या आणि सामना जिंकला. संघाकडून वृद्धीमान साहाने 38 चेंडूत 68 धावा केल्या. राहुल तेवतिया 21 चेंडूत 40 आणि राशिद खान 11 चेंडूत 31 धावा करून नाबाद राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com