'मी निवृत्त'...; सिंधूची फसवी रॅली

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

डेन्मार्क ओपन असहभाग हा अखेरचा धक्का होता, याची जोड त्या फसव्या रॅलीस सिंधूने दिली, पण अखेर तिने या सर्व नकारात्मक वातावरणापासून मी निवृत्त होत आहे असे सांगून चाहत्यांना अखेर दिलासा दिला.

मुंबई- सिंधूने समाजमाध्यमांवर ‘मी निवृत्त’ची फसवी रॅली करून कोट्यवधी चाहत्यांना धक्का दिला. डेन्मार्क ओपन असहभाग हा अखेरचा धक्का होता, याची जोड त्या फसव्या रॅलीस सिंधूने दिली, पण अखेर तिने या सर्व नकारात्मक वातावरणापासून मी निवृत्त होत आहे असे सांगून चाहत्यांना अखेर दिलासा दिला.

गेल्या काही दिवसांत सिंधूच्या कुटुंबासह, मार्गदर्शक गोपीचंद यांच्यासह असलेल्या संघर्षाच्या बातम्याच समाजमाध्यमांवर जास्त चर्चेत आहेत. 

ठळक शब्दांतील मी निवृत्त या शब्दांनी तसेच त्यानंतरच्या दोन पानी पत्रांनी चाहत्यांना गोंधळ झाला असणार याची सिंधूला जाणीव झाली आणि तिने मला नेमके काय म्हणायचे आहे हे तुम्हाला समजले असेल असे म्हटले आहे; मात्र यातून गैरअर्थ काढू नये यासाठी लगेचच मी सध्याच्या अस्थिर परिस्थितीतून, नकारात्मक वातावरणातून, अनिश्‍चिततेच्या प्रश्‍नातून निवृत्त होत आहे, असे  सिंधूने नमुद केले.

महामारीने माझे डोळे उघडले आहेत. खडतर प्रतिस्पर्ध्यांना पराजित करण्यासाठी मी कसून सराव करते आणि करीत राहीन; मात्र न दिसणाऱ्या विषाणूला कसे हरवणार. आज मी या सध्याच्या अस्वस्थतेतून, नकारात्मक वातावरणातून, सातत्याने वाटणाऱ्या भयातून, अनिश्‍चिततेतून, माझे नियंत्रण नसलेल्या, माहिती नसलेल्या गोष्टींपासून निवृत्त होत आहे.- पी. व्ही. सिंधू

संबंधित बातम्या