PAK vs WI: बाबर आझमने रचला इतिहास, मोडीत काढला विराट कोहलीचा विक्रम

या शतकात इतिहास रचण्यासोबतच पाकिस्तानी कर्णधाराने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
Babar Azam
Babar AzamDainik Gomantak

पाकिस्तानने (Pakistan) बुधवारी रात्री तीन सामन्यांच्या वनडे मालिकेमध्ये पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 विकेट्स राखून पराभव केला. कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) 103 धावांची शानदार खेळी खेळत वनडे कारकिर्दीतील 17वे शतक झळकावले आहे. (PAK vs WI Babar Azam makes history breaks Virat Kohli record)

Babar Azam
गोव्याचे टेनिस बॉल क्रिकेट संघ जाहीर

या शतकात इतिहास रचण्यासोबतच पाकिस्तानी कर्णधाराने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) मोठा विक्रम मोडीत काढला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने सलामीवीर शे होपच्या शतकाच्या जोरावर 305 धावा केल्या, ही धावसंख्या पाकिस्तानने 4 चेंडू शिल्लक असताना गाठली आहे.

या सामन्याद्वारे मुलतानमध्ये 14 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आणि कर्णधार बाबर आझमने आपल्या शतकासह चाहत्यांचे स्वागत केले आहे म्हणायला हरकत नाही. या खेळीसह पाकिस्तानच्या कर्णधाराने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 1000 धावाही पूर्ण केल्या आहेत, बाबरने हा आकडा गाठण्यासाठी 13 इनिंग खेळली आहेत आणि जागतिक क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ही कामगिरी करणारा तो सर्वात वेगवान कर्णधार ठरला आहे.

यापूर्वी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता, ज्याने कर्णधार म्हणून 17 डावांमध्ये सर्वात जलद 1000 धावा केल्या होत्या. या यादीत एबी डिव्हिलियर्स (18), केन विल्यमसन (20) आणि अॅलिस्टर कुक (21) तिसऱ्या क्रमांकावरती आहेत.

यासहच बाबर आझमने इतिहास रचत वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्यावेळी शतकांची हॅट्ट्रिक केली. तर बाबरचे वनडे क्रिकेटमधील हे सलग तिसरे शतक आहे. वेस्ट इंडिजपूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॅक टू बॅक शतके देखील झळकावली होती. त्याच वेळी, त्याने 2016 मध्ये कॅरेबियन संघाविरुद्ध तीन बॅक टू बॅक 100 हून अधिक धावा करताना शतकांची हॅट्ट्रिक देखील केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com