ट्‌वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बाबर आझमची विराट कोहली आणि ॲरॉन फिन्चच्या विक्रमाशी बरोबरी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

इंग्लंडविरुद्ध काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात आझमने ४४ चेंडूत ५६ धावा केल्या, परंतु त्याच्या संघाला पराभव सहन करावा लागला.

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्‌वेन्टी-२० सामन्यात पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव झाला असला तरी बाबर आझमने आपले नाव विक्रमाच्या यादीत नोंदवले. या प्रकारात वेगवान दीड हजार धावा करणारा आझम भारतीय कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरॉन फिन्चप्रमाणे संयुक्तपणे तिसरा फलंदाज ठरला. या तिघांनी ३९ सामन्यातच दीड हजार धावांचा टप्पा गाठला आहे.

इंग्लंडविरुद्ध काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात आझमने ४४ चेंडूत ५६ धावा केल्या, परंतु त्याच्या संघाला पराभव सहन करावा लागला. ट्‌वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८२ सामन्यांत २७९४) धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्यानंतर रोहित शर्माने १०८ सामन्यांत २७७३ धावा केलेल्या आहेत. 

पाकिस्तान- इंग्लंड सामन्याचा संक्षिप्त धावफलक: पाकिस्तान: २० षटकांत ४ बाद १९४ (बाबर आझम ५६, फखर झमान ३६, महम्मद हफिझ ६९, आदिल रशिद ३२-२) पराभूत वि. इंग्लंड: जॉनी बेअरस्टॉ ४४, डेव्हिड मलान ५४, इऑन मॉर्गन ६६, शादाब खान ३४-३)

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या