पाकिस्तानी संघाला सरावाच्या वेळी राष्ट्रध्वज फडकावनं पडलं चांगलंच महाग

पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team) ICC T20 विश्वचषक-2021 (ICC T20 World Cup-2021) मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले.
पाकिस्तानी संघाला सरावाच्या वेळी राष्ट्रध्वज फडकावनं पडलं चांगलंच महाग
Pakistan Cricket TeamDainik Gomantak

पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team) ICC T20 विश्वचषक-2021 (ICC T20 World Cup-2021) मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव केला, जो विश्वचषकातील फॉर्मेटमधील भारतावरील पहिला विजय आहे. संघाने अजिंक्य राहत उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र उपांत्य फेरीनंतर विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्डकपनंतर पाकिस्तानचा संघ बांगलादेशच्या (Bangladesh) दौऱ्यावर आहे. मात्र इथे येताच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याचे कारण पाकिस्तान संघाने सरावाच्या वेळी आपल्या देशाचा ध्वज फडकावला होता. आता पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने गुरुवारी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने असे म्हटले आहे की, सराव सत्रादरम्यान देशाचा झेंडा फडकवणे त्यांच्यासाठी काही नवीन नाही. सकलेन मुश्ताकने (Saqlain Mushtaq) हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात प्रवेश केल्यानंतर याची सुरुवात झाली आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या T20 मालिकेपूर्वी सराव सत्रादरम्यान मिरपूरच्या मैदानावर ध्वज फडकावण्याचा निर्णय घेतल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर बांगलादेशच्या अनेक चाहत्यांनी याला देशाच्या सुवर्णमहोत्सवी उत्सवापूर्वी राजकीय खेळी म्हटले. बांगलादेशातील पाकिस्तान संघाच्या मीडिया व्यवस्थापनाने येथे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आमच्यासाठी ही नवीन गोष्ट नाही. सकलेन मुश्ताक संघात आल्यानंतर हा कोचिंगचा भाग आहे. ध्वजासोबत सराव केल्याने खेळाडूंना अधिक प्रेरणा मिळते, असे त्यांचे मत आहे.

Pakistan Cricket Team
IND vs NZ: सामन्यानंतर द्रविड यांच्या कोचिंगवर आश्विनचे भाष्य

गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरु

तत्पूर्वी, या प्रकरणाला गती मिळाल्याचे पाहून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही संघाच्या सरावाच्या वेळी मैदानात देशाचा झेंडा फडकवत आहोत. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, बांगलादेशमध्ये आपल्या संघाला खूप पाठिंबा मिळतो. तो पुढे म्हणाला, "आम्ही संघाला पाठिंबा दिला आहे. आम्ही सरावासाठी बाहेर गेलो की लोक आम्हाला बसमध्ये पाहून प्रोत्साहन देतात. अशा परिस्थितीत टी-20 मालिकेसाठी 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात उतरण्याची मुभा देणे हा चांगला निर्णय आहे.

असा आहे कार्यक्रम

बांगलादेश दौऱ्यावर पाकिस्तानला तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. याशिवाय दोन्ही देशांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात T20 मालिकेने होत आहे. पहिला सामना 19 नोव्हेंबरला ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावर 20 तारखेला दुसरा सामना होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 22 नोव्हेंबरला होणार आहे. 26 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. हा सामना 26 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत चितगावच्या झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसरी कसोटी ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. हा सामना 4 ते 8 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com