टी- ट्वेन्टी आणि कसोटीसाठी पाकिस्तानचा झिम्बॉब्वे दौरा

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

कोरोना माहामारीमुळे नेदरलॅंड्स, आयर्लंड, अफगाणिस्तान, आणि भारत यांनी झिम्बॉब्वेविरुध्दची मालिका स्थगित केली होती.

पाकिस्तान-झिम्बॉब्वे यांच्यात पुढील महिन्यामध्ये दोन कसोटी आणि तीन सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका पार पडणार आहे. 21 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या मालिकेचे सर्व सामने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. जानेवारी 2020 मध्ये श्रीलंकेनंतर झिम्बॉब्वे भेट देणारा पाकिस्तान हा पहिला संघ असणार आहे. कोरोना माहामारीमुळे नेदरलॅंड्स, आयर्लंड, अफगाणिस्तान, आणि भारत यांनी झिम्बॉब्वेविरुध्दची मालिका स्थगित केली होती.

जुलै 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने झिम्बॉब्वे संघाला निलंबीत केले होते. त्यामुळे कसोटी खेळण्य़ासाठी हा संघ धडपडत आहे. 2019 आयसीसीने झिम्बॉब्वे संघाचे निलंबन मागे घेतले आहे. मात्र तरीही झिम्बॉब्वे संघाला कसोटी सामने खेळता आलेले नाहीत. (Pakistan tour of Zimbabwe for T20 and Test)

INDvsENG 3rd ODI: मैदानावर उतरताच विराट कोहलीच्या नावावर झाला अनोखा विक्रम 

या महिन्याच्या सुरुवातीलाच युएईमध्ये अफगाणिस्तानबरोबर झिम्बॉब्वेने कसोटी आणि टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळली होती. 21 ते 25  एप्रिल दरम्यान झिम्बॉब्वे आणि पाकिस्तान यांच्यात टी-ट्वेन्टी मालिका आणि 29 एप्रिल ते 11 मे दरम्यान कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

 

संबंधित बातम्या