टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघ भारतात येणार

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

 भारतात होणाऱ्या टी-ट्वेन्टी क्रिकेट वर्ल्डकपसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा मिळणार  आहे. सरकारकडून आश्वासन आल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याविषयी माहिती दिली आहे. हा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारतामध्ये नऊ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. काल शुक्रवारी पार पडलेल्या बीसीसीआयच्या शिखर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगंळूरु, हैदराबाद, धर्मशाला, दिल्ली, लखनऊ या ठिकाणी वर्ल्डकप स्पर्धा रंगणार आहे. परिषदेमधील एका सदस्याने सांगितले की, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाच्या व्हिसाचा प्रश्न मिटला आहे. मात्र चाहत्यांना वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मैदानात येण्याची परवानगी दिली जाणार का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याचा निर्णय योग्य वेळी होईल. महत्त्वाचं म्हणजे भारत आणि पाकिस्तान एक दशकभर आपपसात द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळले नाहीत. (Pakistan to visit India for T20 World Cup)

पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर एकटा विराटच पडतोय भारी

2016 मध्ये टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारतात खेळला गेला, त्या दरम्यान बीसीसीआयने सात ठिकाणी या स्पर्धेचे सामने खेळवले होते. मोहाली आणि नागपूर या ठिकाणीही सामने खेळवण्यात आले होते. पण यंदा हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या