''त्याला तंदुरुस्त होण्यासाठी...'', श्रेयस अय्यरच्या दुखापतीनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन; BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Shreyas Iyer Injury Update: आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध दुखापतीमुळे संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असलेल्या श्रेयस अय्यरबद्दल बीसीसीआयने मोठी माहिती शेअर केली आहे.
Shreyas Iyer
Shreyas IyerDainik Gomantak

Shreyas Iyer Injury Update: आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध दुखापतीमुळे संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असलेल्या श्रेयस अय्यरबद्दल बीसीसीआयने मोठी अपडेट शेअर केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत म्हटले की, 'श्रेयस अय्यरला आता पूर्वीपेक्षा बरे वाटत आहे, पण त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने विश्रांतीचा सल्ला दिला असून तो संघासोबत स्टेडियममध्ये जाणार नाही. याचाच अर्थ श्रीलंकेविरुद्धच्या सुपर फोर सामन्यातही तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही.'

यापूर्वी, तो पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या आशिया कपच्या साखळी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 9 चेंडूत 14 धावांची छोटी पण प्रभावी खेळी खेळली. अय्यरने आपल्या खेळीत 2 चौकार मारले होते. मात्र, नेपाळविरुद्धच्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

केएल राहुलला संधी मिळाली

पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोरच्या सामन्यापूर्वी पाठीच्या समस्येमुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागले आणि त्याच्या जागी दुखापतीतून परतलेल्या केएल राहुलला संधी मिळाली. राहुलने या संधीचं सोनं करुन दाखवलं. पाकिस्तानविरुद्ध वनडे कारकिर्दीतील त्याने सहावे शतक झळकावले. त्याने 106 चेंडूत 111 धावांची विस्फोटक खेळी खेळली. सर्वोच्च धावसंख्येच्या बाबतीत, त्याने 111 धावांची बरोबरी केली. टीम इंडिया सुपर फोरचा शेवटचा सामना 15 सप्टेंबरला खेळणार आहे तर आशिया कपचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com