टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज बाबर आझम राहिला 'अनसोल्ड'

इंग्लंडमध्ये खेळली जाणारी 'द हंड्रेड' टूर्नामेंट खूप लोकप्रिय झाली आहे.
Babar Azam
Babar Azam Dainik Gomantak

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या बाबर आझमची ताकद ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही पाहायला मिळाली. मात्र या शानदार कामगिरीनंतरही त्याला इंग्लंडच्या स्थानिक टी-20 लीग 'द हंड्रेड'मध्ये कोणताही खरेदीदार मिळाला नाही. (Pakistani captain Babar Azam remains unsold in The Hundred Tournament)

Babar Azam
'...दारुच्या नशेत मला'; चहलने केला धक्कादायक रहस्याचा खुलासा

'द हंड्रेड'मध्ये एकूण 8 संघ खेळणार आहेत. पाकिस्तानी (Pakistan) क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम व्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल, आरोन फिंच आणि ऑस्ट्रेलियाचा (Australia) मोहम्मद आमीर यासह इतर काही खेळाडूंनाही खरेदीदार मिळालेला नाही. मात्र ड्वेन ब्राव्हो, आंद्रे रसेल, पोलार्ड, वानिंदू हसरंगा, क्विंटन डी कॉक यांच्यासह काही स्टार्सना भरपूर पैसे मिळाले. 'द हंड्रेड'मध्ये पोलार्डला 1.25 लाख युरो, ग्लेन मॅक्सवेलला 1 लाख युरो, आंद्रे रसेलला 1.25 लाख युरो, वानिंदू हसरंगा यांना 1 लाख युरो मिळत आहेत.

Babar Azam
IPL: दिल्ली कॅपिटल्स संघाला दुहेरी फटका

ही स्पर्धा 3 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सध्या सर्व संघांना जुलैमध्ये पुन्हा एकदा संधी मिळणार आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या संघात एका परदेशी आणि एका देशाच्या खेळाडूचा समावेश करू शकतात. इंग्लंडमध्ये खेळली जाणारी 'द हंड्रेड' टूर्नामेंट खूप लोकप्रिय झाली आहे, ज्यामध्ये एका डावात 100 चेंडू खेळले जातात. गेल्या वर्षी या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळीही ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत लंडन (London) स्पिरिट, वेल्श फायर, मँचेस्टर ओरिजिनल्स, नॉर्दर्न सुपरचार्जर्स, ओव्हल इनव्हिजिबल, ट्रेंट रॉकेट्स, बर्मिंगहॅम फिनिक्स, सदर्न ब्रेव्ह असे संघ आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com