Video: शोएब अख्तरची डेजर्ट बाइकरील स्टंटबाजी आली अंगलट

शोएब अख्तरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर डेजर्ट बाइकवरील स्टंटबाजी करतानाच व्हिडीओ सहारे केला आहे.
Shoaib Akhtar
Shoaib AkhtarDainik Gomantak

शोएब अख्तर सध्या ओमानमधील लीजेंड्स लीग क्रिकेटशी (Legends League Cricket) जुळला आहे. तो आशिया लॉयंस संघाचा भाग आहे. ओमानमध्ये क्रिकेट खेळण्यासोबतच तो इतर उपक्रमांमध्ये देखील भाग घेत आहे. यामध्ये तो वाळवंटात बाईकवर रेसिंग करत होता. परंतु स्टंटबाजी (Bike Stunt)करण्याच्या प्रत्यत्नमध्ये बाईकवरून तो खाली पडला आणि त्याची बाईक उलटली.

शोएबला (Shoaib Akhtar) मात्र कोणतीही दुखापत झाली नाही. बाईक उलटल्यानंतर तो हसताना दिसला. शोएबने त्याचा हा व्हिडीओ इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटला शेअर केला आहे. यामध्ये तो वाळवंटामधील (Desert) रेसिंगचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे.

Shoaib Akhtar
योगदान देत गेलो, बहुमान मिळत राहिले : ब्रह्मानंद शंखवाळकर

व्हिडीओ (Video) शेअर करताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलदांज शोएबने खाली लिहिले, Live, Love, laugh’ म्हणजे आनंदी आयुष्य जगा आणि स्माईली इमोजी दिली आहे. 45 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये शोएब बाईकचा (Bike)आनंद लुटताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सुरवातीला शोएब वेगाने बाईक चालवत आहे नंतर ती बाईक उलटते. यादरम्यान शोएब खाली पडतो, आणि स्वतः च हसत उठतो. मग टाळ्या ऐकू येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com