पीटरसनच्या ‘त्या’ ट्विटला पाकिस्तानी चाहत्यांच्या भडक प्रतिक्रीया 

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

आयपीएल चालु असताना कोणत्याही प्रकारचे मोठे सामने आयोजित करु नका.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इंडियन प्रिमिअर लिगच्या 14 व्या (आयपीएल) हंगामाची सुरुवात होणार आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने आयपीएलच्या स्पर्धेबाबत मोठी प्रतिक्रीया दिली आहे. आयपीएलला जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणत सर्व क्रिकेट बोर्डांनी या काळात आंतरराष्ट्रीय सामने आयोजित न करण्य़ाचे आवाहन पीटरसनने केले आहे. आपल्या ट्विटर हॅंडलवरुन पीटरसनने हे मत दिले आहे. मात्र या मतावर पीटरसनच्या पाकिस्तमधील चाहत्यांनी भडक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पीटरसन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला, ‘’क्रिकेट बोर्डाना हे समजणे आवश्यक आहे की, आयपीएल हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. आयपीएल चालु असताना कोणत्याही प्रकारचे मोठे सामने आयोजित करु नका. ही खूप सोपी गोष्ट आहे.’’ (Pakistani fans reacted strongly to Petersons tweet)

स्विंगच्या किंगचा मास्टर ब्लास्टरला खास संदेश

काही दिवसातच आयपीएलच्या 14 व्या पर्वाची सुरुवात होणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान सामने खेळवले जाणार आहेत. इंग्लंडच्या न्यूझीलंडविरुध्दच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका 2 जूनपासून सुरु होणार आहे.

आयपीएलचे सामने संपल्यानंतर एकाच दिवसानंतर या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या काही क्रिकेटपटूंचा आयपीएलमध्ये सहभाग आसल्यामुळे ते संभ्रमात आहेत. आयपीएल सामने अर्धवट सोडणे किंवा राष्ट्रीय कर्तव्य टाळणे हे दोनच पर्याय या खेळांडूपुढे असतील. पण इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे संचालक अश्ले गाइल्स यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, इंग्लीश क्रिकेटपटूंनी आयपीएल पेक्षा राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देण्यासाठी आम्ही बंधन घालणार नाही.

 

संबंधित बातम्या