न्यूझीलंडमध्ये क्रिकेट मालिकेसाठी दाखल झालेले पाकिस्तानचे खेळाडू बेशिस्त

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

विलगीकरण नियमाचा सातत्याने भंग होत असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाला निर्वाणीचा इशारा दिल्याचे न्यूझीलंड आरोग्य मंत्रालयाने सांगितले. पाकिस्तानचा ५३ सदस्यीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आला आहे.

ख्राईस्टचर्च :  विलगीकरण नियमाचा सातत्याने भंग होत असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाला निर्वाणीचा इशारा दिल्याचे न्यूझीलंड आरोग्य मंत्रालयाने सांगितले. पाकिस्तानचा ५३ सदस्यीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आला आहे. या संघातील अनेकांनी विलगीकरणाच्या नियमाचा भंग केल्याचे सीसी टीव्हीने टिपले आहे. त्यांना विलगीकरणाबाबतच्या नियमांची पूर्ण माहिती देण्यात आली होती. त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या वागणुकीची त्यांना जाणीव करून देण्यात आली होती, असेही या प्रवक्‍त्यांनी सांगितले.

पाक संघातील सर्व सदस्यांना आता रूममध्येच राहण्याची सूचना करताना त्यांची सरावाची सुविधा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, पाक संघातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या संघातील सर्वांची पाकमध्ये तीनदा कोरोना चाचणी झाली होती. बाधा झालेल्या या सहा जणांपैकी दोघे हिस्टॉरिकल आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना हिस्टॉरिकल संबोधले जाते. आता किमान चार वेळा कोरोना चाचणी झाल्यानंतरच पाक संघातील खेळाडूंना सरावाची मंजुरी देण्यात येणार आहे. 

अधिक वाचा :

कर्णधार विराट कोहलीदेखील रोहितच्या दुखापतीबाबत साशंक 

आयएसएलमध्ये फॉर्म परत मिळवण्यासाठी एफसी गोवाचा संघर्ष

 

 

 

 

संबंधित बातम्या