पाकिस्तानच्या बाबर आझमने विराटला केलं ओव्हरटेक 

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

बाबरने एकदिवसीयमधील सर्वात वेगवान 13वे शतक करण्याचा मान मिळवला.

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये पाकिस्तानच्या  3 गड्यांनी रोमहर्षक विजय नोंदवला. विजयासाठी एका धावेची गरज असताना पाकिस्तानच्या फहिम अशरफने शेवटच्या चेंडूवर एक धाव काढत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज बाबर आझमने या एकदिवसीय सामन्यामध्ये आपल्या कारकिर्दीतील 13वे शतक झळकावत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे.

पाकिस्तानचा संयमी आणि दिग्गज फलंदाज असा नावलौकीक कमावलेल्या बाबरने एकदिवसीयमधील सर्वात वेगवान 13वे शतक करण्याचा मान मिळवला. बाबरने 76 व्या डावामध्ये ही कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाने एकदिवसीय कारकीर्दीतील 13 वे शतक 83 डावामध्ये पूर्ण केले तर विराट कोहलीने इतकी शतके 86 डावामध्ये पूर्ण केले. पाकिस्तान- दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडत असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकामध्ये 273 धावा केल्या. रसी व्हॅन डर डुसानने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीमधील पहिले शतक झळकावले. 123 धावा करत तो नाबाद राहीला. याव्य़तिरिक्त डेव्हीड मिलरने अर्धशतक ठोकले. (Pakistans Babar Azam overtook Virat)

सौदीनं आफ्रिदीला केलं ओव्हरटेक, मलिंगाचा विक्रम मोडणार?

आफ्रिकेला प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या इमाम-उल-हकने 70 धावांची खेळी केली. तर कर्णधार बाबर आझमने 103 धावा केल्या. शेवटी शादाब खानने 33 धावा काढत पाकिस्तानला तीन गडी राखून विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 52 चेंडूमध्ये 40 धावा काढत पाकिस्तानच्या विजयासाठी योगदान दिले. 
 

संबंधित बातम्या