पाकिस्तानच्या ''या'' दिग्गज फलंदाजाने भारतीयांसाठी केली प्रार्थना

Pakistans Ya veteran batsman prays for Indians
Pakistans Ya veteran batsman prays for Indians

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. जगभरातील अनेक देश भारताला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. संपूर्ण जग भारतीयांसाठी प्रार्थना करत आहेत. आयपीएल खेळणाऱ्या अनेक फलंदाजानी स्पर्धेतून माघार घेतली असून उर्वरित फलंदाजांनी भारतातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान संघाचा कप्तान बाबर आझमने (Babar Azam) भारतीयांसाठी संवेदना व्यक्त केल्या आहेत. (Pakistans Ya veteran batsman prays for Indians)

याआगोदर पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरनेही (Shoaib Akhtar) देखील भारतीयांसाठी प्रार्थना केली होती. आता बाबर आझमने ट्विट करुन कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. बाबरने म्हटले की, ‘’या कोरोनाच्या कठीण परिस्थितीत माझी प्रार्थना भारतीय लोकांसोबत आहे. शक्ती दाखवण्याची आणि सगळ्य़ांनी मिळून एकत्र प्रार्थना करण्याची वेळ आली आहे. मी लोकांना कोरोनाच्या कडक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतो. हे आपल्यासाठी सुरक्षित असेल आणि आपण मिळून हे करु शकतो.’’

पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज असलेल्या बाबर आझमने विश्वविक्रम प्रस्थापित करत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohali) मागे टाकले होते. बाबर आझमने आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये वेगवान 2000 धावांचा विक्रम नोंदवला आहे. झिम्बाब्वेविरुध्द तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात बाबरने या विक्रमाला गवसणी घातली आहे. बाबरला ही कामगिरी करण्यासाठी 52 डाव खेळावे लागले होते. तर विराटने 2000 धावांचा टप्पा 56 डावात पूर्ण केला होता.

काही दिवसांपूर्वीच जगातील पहिल्या क्रमांकाचा एकदिवसीय फलंदाज होण्याचा मान बाबर आझमने पटकावला होता. टी-ट्वेन्टी क्रमवारीत बाबरने 844 गुणासंह दुसऱ्या तर विराट 762 गुणासंह पाचव्या स्थानावर आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com