Pakistan: माणुसकीला काळीमा ! ऑलिम्पिक चॅम्पियनचा मृतदेह देण्यास डॉक्टरांचा नकार

Manzoor Hussain Death: मंजूर हुसेन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Manzoor Hussain
Manzoor HussainDainik Gomantak

Pakistan Olympian Manzoor Hussain: एकेकाळी पाकिस्तानात हॉकीची क्रेझ होती, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार मंजूर हुसेन. मंजूर हुसेन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. परंतु उपचाराची थकबाकी न भरल्यामुळे पाकिस्तानातील एका खासगी रुग्णालयाने सोमवारी अनेक तास त्यांचा मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. मंजूर हुसेन पाकिस्तानसाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचा भाग होते.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला

मंजूर हुसेन (Manzoor Hussain) यांना हृदयविकाराचा त्रास होता. प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ऑलिम्पियनला लाहोरच्या शालीमार रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. ते 64 वर्षांचे होते. पाकिस्तानच्या (Pakistan) सर्वोत्तम खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते.

Manzoor Hussain
Asia Cup 2022: पाक चा माजी कर्णधार महिला पत्रकारावर भडकला, पराभवानंतर सुरु झाला वाद

सुवर्णपदक विजेत्या संघाचा भाग होते

64 वर्षीय हुसेन मंजूर ज्युनियर म्हणून प्रसिद्ध होते. 1976 आणि 1984 ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे ते कांस्य आणि सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचा भाग होते. 1978 आणि 1982 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या हॉकी (Hockey) संघांचाही ते भाग होते. त्यांनी पाकिस्तान संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले.

पाकिस्तान हॉकी महासंघाने याची दखल घेतली

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "रुग्णालय व्यवस्थापनाने उपचारासाठी देय न दिल्याने या माजी दिग्गजाचा मृतदेह कित्येक तास रुग्णालयातच ठेवला. त्यानंतर पाकिस्तान हॉकी फेडरेशनने (PFH) या प्रकरणाची दखल घेत पाच लाख रुपये देण्याची व्यवस्था केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Manzoor Hussain
Asia Cup 2022 पूर्वी वसीम अक्रमने सांगितली पाक संघाची कमजोरी

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शोक व्यक्त केला

ऑलिम्पिक चॅम्पियनच्या मृतदेहासोबत अशी लज्जास्पद घटना घडणे ही पाकिस्तानसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. ट्वीटमध्ये शरीफ यांनी म्हटले की, "सुवर्णपदक विजेते मंजूर हुसेन ज्युनियर हे देशाचा एक चेहरा होते. पाकिस्तान हॉकीसाठी त्यांची सेवा संस्मरणीय होती.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com