गोवा प्रोफेशनल लीग : पणजी फुटबॉलर्सचे एफसी गोवावर वर्चस्व

दैनिक गोमन्तक
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

पणजी फुटबॉलर्सने नऊ खेळाडूंसह खेळलेल्या एफसी गोवा संघावर वर्चस्व राखताना गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत 1 - 0 असा निसटत्या फरकाने विजय मिळविला. सामना शुक्रवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

पणजी : पणजी फुटबॉलर्सने नऊ खेळाडूंसह खेळलेल्या एफसी गोवा संघावर वर्चस्व राखताना गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत 1 - 0 असा निसटत्या फरकाने विजय मिळविला. सामना शुक्रवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

विजय हजारे करंडक : गोव्याने साकारला पहिला विजय

सामन्याच्या पूर्वार्धात प्रसिल काणकोणकर याने नोंदविलेल्या गोलमुळे पणजी फुटबॉर्सने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. सामन्याच्या 26 व्या मिनिटास प्रसिलने सेटपिसेसवर हा गोल केला. वाल्मिकी मिरांडा फटका एफसी गोवाचा गोलरक्षक डायलन डिसिल्वा याने रोखला, पण तो चेंडूवर ताबा राखू शकला नाही. त्याचा लाभ पणजी फुटबॉलर्सला मिळाला.

ISL 2020-21 : ओडिशा-ईस्ट बंगाल लढत केवळ औपचारिकता

पूर्वार्धातील इंज्युरी टाईममध्ये एफसी गोवास बरोबरीची संधी होती, पण डेल्टन कुलासोचा फटका गोलपट्टीस आपटून दिशाहीन ठरला. गोलबरोबरीच्या शोधात उत्तरार्धात एफसी गोवाने अतिआक्रमणावर भर दिला, त्यामुळे त्यांच्या खेळाडूंकडून चुकाही झाल्या आणि खेळाडूंना रेड कार्ड मिळाले. 67 व्या मिनिटास अखिलाडूवृत्तीमुळे ब्रायसन फर्नांडिसला थेट रेड कार्ड दाखविण्यात आले. सामन्याच्या 78 व्या मिनिटास बदली खेळाडू रोमियो फर्नांडिसचा फटका गोलपट्टीवर आपल्यामुळे एफसी गोवा संघा पुन्हा बरोबरीपासून दूर राहिला. सामन्याच्या इंज्युरी टाईममधील चौथ्या मिनिटास एफसी गोवाच्या आणखी एका खेळाडूस रेड कार्ड मिळाले. यावेळी त्यांच्या ब्रायन फारिया याला सामन्यातील दुसरे यलो कार्ड प्राप्त झाले.

संबंधित बातम्या