पणजी फुटबॉलर्स अंतिम फेरीत

स्पर्धेच्या अंतिम फेरीत पणजी फुटबॉलर्स (Panaji footballers) संघासमोर धेंपो स्पोर्टस क्लबचे आव्हान असेल.
पणजी फुटबॉलर्स अंतिम फेरीत
पणजी फुटबॉलर्सच्या जॅनियो फर्नांडिस याला सामनावीर पुरस्कार देताना आलेक्स अल्वारिस, सोबत अँथनी मोन्सेरात.Dainik Gomantak

पणजी: पणजी फुटबॉलर्सने (Panaji footballers) कळंगुट असोसिएशनवर 2-0 फरकाने विजय नोंदवत १७व्या गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य लढत शुक्रवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाली.

पणजी फुटबॉलर्सच्या जॅनियो फर्नांडिस याला सामनावीर पुरस्कार देताना आलेक्स अल्वारिस, सोबत अँथनी मोन्सेरात.
महिला फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी स्टेसी

सामन्यातील दोन्ही गोल उत्तरार्धातील खेळात झाले. पांडुरंग गावस याने 54 व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. नंतर साठाव्या मिनिटास इरफान यादवड याने पणजी फुटबॉलर्सची आघाडी भक्कम केली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत पणजी फुटबॉलर्स संघासमोर धेंपो स्पोर्टस क्लबचे आव्हान असेल. विजेतेपदासाठी 24 नोव्हेंबरला लढत होईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com