पणजी फुटबॉलर्स बनले गोवा पोलिस कपचे विजेते

चुरशीच्या अंतिम लढतीत धेंपो क्लबवर एका गोलने मात; प्रथमच विजेते
पणजी फुटबॉलर्स बनले गोवा पोलिस कपचे विजेते
Panaji Footballers win Goa police cup Dainik Gomantak

सामन्याच्या उत्तरार्धात जॉयसन गांवकार याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर पणजी फुटबॉलर्सने (Football) 17 व्या गोवा पोलिस कप (Goa Police Cup) स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. बुधवारी संध्याकाळी प्रकाशझोतात झालेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत त्यांनी धेंपो स्पोर्टस क्लबवर 1-0 फरकाने मात केली. (Panaji Footballers win Goa police cup)

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर दोन्ही संघ पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत होते. उत्तरार्धातील खेळात जॉयसनने बरोबरीची कोंडी फोडली. तोच अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ केलेला पणजी फुटबॉलर्सचा आघाडीपटू इरफान यादवड स्पर्धेचा मानकरी ठरला. पणजी फुटबॉलर्सने ही स्पर्धा प्रथमच जिंकली आहे.

बक्षीस वितरण राज्याचे पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला, म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव, पोलिस अधिकारी राजेश कुमार, परमादित्य, शेखर प्रभुदेसाई, शोबित सक्सेना, सेराफिन डायस, ॲक्सिस बँकेच्या शभाना कामत, डेक्कन फाईन केमिकल्सचे गौरव कुडचडकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

Panaji Footballers win Goa police cup
गतविजेत्या बंगळूर एफसीच्या पराभवाचे मुख्य कारण बनले सुपरस्टार खेळाडूचे अपयश

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com