KKR ला मोठा झटका, संघाचा अनुभवी खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

IPLमध्ये त्याने 5 सामने खेळले असून 63 धावा केल्या आहेत. यासोबतच 7 विकेट्सही घेतल्या आहेत
KKR ला मोठा झटका, संघाचा अनुभवी खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
Pat CumminsDainik Gomantak

Pat Cummins Ruled out KKR IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी खेळाडू पॅट कमिन्स (Pat Cummins) दुखापतीमुळे IPL बाहेर पडला आहे. कमिन्स हिपच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडेल आणि तो लवकरच मायदेशी परतणार आहे. या मोसमात त्याने चांगली कामगिरी केली आहे. कमिन्सने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच त्याने अर्धशतकही केले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ सध्या कोलकाता (KKR) गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. संघाची सुरुवात चांगली झाली. पण नंतर संघाची कामगिरी खालावली.

Pat Cummins
डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत बंगळूर एफसीला विजेतेपद

Cricket.com.au ने कमिन्सच्या IPL 2022 मधून बाहेर पडण्याची पुष्टी केली आहे. मात्र, यासंदर्भात केकेआर किंवा आयपीएलकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. आता त्याच्या दुखण्यामुळे तो स्पर्धा सोडून सिडनीला परतणार आहे. त्यांचा संघ केकेआर या मोसमात काही विशेष कामगिरी करू शकला नाही. संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले असून या कालावधीत 5 सामने जिंकले आहेत. तर 7 सामन्यात संगाला पराभव पत्करावा लागला होता.

Pat Cummins
दिनेश कार्तिकचे कौतुक करताना गावस्कर म्हणाले....

या मोसमासाठी कोलकाताने कमिन्सला 7.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने या मोसमात 5 सामने खेळले असून 63 धावा केल्या आहेत. यासोबतच 7 विकेट्सही घेतल्या आहेत. कमिन्सच्या एकूण कामगिरीवर नजर टाकली तर तो प्रभावी खेळाडू ठरला आहे. कमिन्सने 42 सामन्यांत 45 विकेट घेतल्या आहेत. यासह त्याने 379 धावा केल्या आहेत. कमिन्सने या स्पर्धेत ३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 26 षटकार आणि 24 चौकार मारले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.