पंजाबने राजस्थानला दिले 190 धावांचे लक्ष्य; सामन्यात जितेशची शानदार खेळी

PBKS vs RR Latest Updates : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो आज पंजाब किंग्जसाठी सलामीला आले.
PBKS vs RR Latest Updates
PBKS vs RR Latest Updates Dainik Gomantak

PBKS vs RR Latest Updates : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या IPL 2022 च्या 52 व्या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम खेळताना 20 षटकांत 5 गडी गमावून 189 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून जॉनी बेअरस्टोने 56 धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर शेवटी यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माने 18 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या.

PBKS vs RR Latest Updates
IPL 2022 : गुजरातनंतर आणखी 3 संघ मुंबईच्या निशाण्यावर

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो आज पंजाब किंग्जसाठी सलामीला आले. सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या बेअरस्टोच्या बॅटमधून धावा निघाल्या. त्याने या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले. मात्र, धवनला केवळ 12 धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या भानुका राजपक्षेने 18 चेंडूत 27 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले.

दुसरीकडे बेअरस्टोने मोठे फटके खेळत राहिले. त्याने 40 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 56 धावांची शानदार खेळी खेळली. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार मयांक अग्रवाल 13 चेंडूत केवळ 15 धावा करू शकला. 118 धावांवर तिसरी विकेट आणि 119 धावांवर चौथी विकेट पडल्यामुळे पंजाबच्या डावाला ब्रेक लागला. हे दोघेही चहलने बाद केले.

मात्र यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांनी शानदार फलंदाजी केली. लिव्हिंगस्टोनने 14 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 22 धावा केल्या. त्याचवेळी जितेशने अवघ्या 18 चेंडूत नाबाद 38 धावांची स्फोटक खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 2 षटकार आले. शेवटी ऋषी धवन दोन चेंडूत पाच धावा काढून नाबाद माघारी परतला.

राजस्थान रॉयल्सकडून गोलंदाजीत युझवेंद्र चहल पुन्हा एकदा चमकला. चहलने चार षटकांत 28 धावा देत तीन बळी घेतले. याशिवाय आर अश्विन आणि प्रसिद्ध कृष्णाला प्रत्येकी एक विकेट मिळाली. मात्र, कृष्णाने चार षटकांत 48 धावा दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com