लाजिरवाणं! 'या' पाकिस्तानी क्रिकेटपटूने महिला क्रिकेटरसोबत केलं घाणेरडं कृत्य

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) महिला खेळाडूचा विनयभंग केल्याप्रकरणी माजी खेळाडू आणि सध्याच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकाला निलंबित केले आहे.
लाजिरवाणं! 'या' पाकिस्तानी क्रिकेटपटूने महिला क्रिकेटरसोबत केलं घाणेरडं कृत्य
PCBDainik Gomantak

PCB: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) महिला खेळाडूचा विनयभंग केल्याप्रकरणी माजी खेळाडू आणि सध्याच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकाला निलंबित केले आहे. एका महिला क्रिकेटपटूने मुलतान विभागाचे प्रशिक्षक नदीम इक्बाल यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. नदीम हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध वेगवान गोलंदाज होते.

प्रकरणाचा तपास सुरु आहे

पीसीबीच्या (PCB) एका अधिकाऱ्याने पुष्टी केली की, नदीम यांनी बोर्डातील नोकरीच्या अटींचे उल्लंघन केले आहे की नाही हे शोधण्यासाठी आम्ही या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. "साहजिकच आम्ही पोलिसांसारखा (Police) कोणताही गुन्हेगारी तपास करु शकत नाही. परंतु आमच्या तपासात त्यांनी कराराच्या अटींचे उल्लंघन केले आहे की नाही हे उघड होईल."

PCB
पैगंबर विवाद: भारताविरोधात पाकिस्तान चालवतोय सोशल मीडियावर 'नापाक' मोहिम

वकार हा अधिक मजबूत गोलंदाज मानला जात होता

50 वर्षीय नदीमने 80 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. एकेकाळी ते भेदक गोलंदाजीसाठी ओळखले जात होते. पीडित महिला क्रिकेटपटूने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत दावा केला आहे की, काही वर्षांपूर्वी मी पीसीबीच्या महिला चाचणीसाठी मुल्तानला गेले होते, तेव्हा नदीम तिथे उपस्थित असलेल्या अनेक प्रशिक्षकांपैकी एक होते.

दरम्यान, इथे जारी करण्यात आलेल्या व्हिडिओ संदेशात पीडितेने सांगितले की, "मला महिला संघात घेण्याचे आणि बोर्डात नोकरी मिळवून देण्याचे वचन नदीम यांनी दिले." ते माझे लैंगिक शोषण करत राहिले आणि त्यांचे काही मित्रही यात सामील होते. त्यांनी माझा व्हिडिओही बनवला आणि नंतर मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.''

PCB
'अन् त्याने वनडेत विराट कोहलीला जवळपास मागे टाकले' : इयान बिशप

आधी गदारोळ झाला

यापूर्वी 2014 मध्ये पाच महिला क्रिकेटपटूंनी मुलतानमधील एका खासगी क्रिकेट क्लबच्या अधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. गेल्या वर्षी, पाकिस्तानचा कसोटी लेग-स्पिनर यासिर शाहवरही तरुणीचे लैंगिक शोषण करण्यात मदत केल्याचा आणि नंतर तिला धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रार करणाऱ्या महिलेने नंतर यासिरवरील आरोप मागे घेतले असले तरी त्याच्या मित्राविरुद्धचा खटला अद्याप न्यायालयात (Court) प्रलंबित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com