पाकिस्तान संघाला नंबर वन बनवण्यासाठी पीसीबी 'पॉवर हिटिंग कोच' च्या शोधात !

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) आपल्या राष्ट्रीय संघासाठी पॉवर हिटिंग फलंदाजी कोचच्या शोधात आहे.
Pakistan team


Pakistan team

Dainik Gomantak 

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या राष्ट्रीय संघासाठी पॉवर हिटिंग फलंदाजी कोचच्या शोधात आहे. यासोबतच टीमने हाय परफॉर्मन्स कोचसह पाच वेगवेगळ्या प्रशिक्षकांच्या पदांसाठी जाहिरातीही प्रसिद्ध केल्या आहेत.

पीसीबीने (Pakistan Cricket Board) एका निवेदनात म्हटले आहे की, ''हाई परफॉर्मेंस प्रशिक्षकाकडे गेल्या 10 वर्षांमध्ये पाच वर्षांचा कामाचा अनुभव असावा. यासोबतच त्याला मातब्बर खेळाडू किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघांना प्रशिक्षण देण्याचाही अनुभव असावा. "उर्वरित चार प्रशिक्षकांसाठी पात्रता ही गेल्या 10 वर्षातील किमान पाच वर्षांचा कोचिंग अनुभव तसेच लेव्हल-III स्तरावरील क्रिकेट कोचिंग प्रमाणपत्रही अनिवार्य."

दरम्यान, टी-20 फॉरमॅटमध्ये पाकिस्तानने गेल्या काही महिन्यांपासून उत्तम कामगिरी केली आहे. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील संघाने T20 विश्वचषक 2021 च्या सुपर-12 मध्ये सलग पाच सामने जिंकले. भारत, नामिबिया, स्कॉटलंड, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांचा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला.

शिवाय, रमीझ राजा (Rameez Raja) जेव्हापासून PCB चे अध्यक्ष झाले तेव्हापासून ते पाकिस्तान संघ नंबर वन बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंडने पाकिस्तानचा (Pakistan) दौरा रद्द केला होता, त्यानंतर रमीझ राजा यांनी सांगितले होते की, आमचा संघ जगातील सर्वोत्तम संघ बनेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com