दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचा मोठा सन्मान, डिक्शनरीत नावाचा समावेश; पेलेचा अर्थ...

दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांच्या नावाचा शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे.
Pele
PeleDainik Gomantak

दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांच्या नावाचा शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे. 'पेले' हा शब्द आता 'असा असामान्य व्यक्ती' म्हणून ओळखला जाईल. माइकलिस डिक्शनरीच्या पोर्तुगीज आवृत्तीत तीन वेळच्या विश्वचषक विजेत्याचे नाव 'नवीन विशेषण' म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.

शब्दकोश मोहिमेत पेले

या महिन्याच्या सुरुवातीला, पेले फाऊंडेशन आणि स्पोर्टव्ह यांनी पेले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि खेळाव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील त्यांचा वारसा ओळखण्यासाठी 'पेले इन द डिक्शनरी' मोहीम सुरु केली. या मोहिमेला लाखो लोकांचा पाठिंबा मिळाला आणि एक लाखाहून अधिक स्वाक्षऱ्या झाल्या. या माजी खेळाडूचे नाव आता शब्दकोशात समाविष्ट झाले आहे.

Pele
Pele Video: पेले यांना अखेरचा अलविदा! हजारो चाहत्यांची अंतिम दर्शनासाठी उपस्थिती

'असा असामान्य व्यक्ती'

पेले या शब्दाचा अर्थ आता असा होईल - जो सामान्य नसलेला, गुणवत्तेने, मूल्याने किंवा उत्कृष्टतेने कोणाचीही बरोबरी करु शकत नाही - तो पेलेसारखा असेल. बुधवारी पाकंबू येथील समिट स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये या शब्दाते अनावरण करण्यात आले.

Pele
Pele Hospitalized: ब्राझीलीयन स्टार पेले रुग्णालयात दाखल, कॅन्सरशी झुंज सुरु

माइकलिस डिक्शनरीचे कार्यकारी संचालक जो फ्रेगा म्हणाले - "शब्दकोषातील पेले मोहीम ही आतापर्यंतची सर्वात मौलिक मोहिमांपैकी एक आहे... शब्दकोषातील त्यांचे नाव त्यांच्या वारशाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com