Virat Kohli: कोहलीच्या रुमचा व्हिडिओ लीक करणाऱ्याला पडकडले, हॉटेलची मोठी कारवाई

Virat Kohli Leaked Video of Perth Hotel: टीम इंडियाचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीच्या हॉटेल रुमचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर लीक झाला.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

Virat Kohli Leaked Video of Perth Hotel: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीच्या हॉटेल रुमचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर लीक झाला होता. त्यानंतर खुद्द विराटने नाराजी व्यक्त केली होती. आता हा व्हिडिओ बनवणाऱ्याला पकडण्यात आले आहे. हा सर्व प्रकार घडलेल्या हॉटेलच्या व्यवस्थापनाने कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 विश्वचषकाच्या सामन्यासाठी पर्थमध्ये होता.

विराटची बिनशर्त माफी मागतो

पर्थच्या हॉटेल व्यवस्थापनाने एक निवेदन जारी केले आहे. हॉटेलचे नाव क्राउन आहे. त्यांच्या प्रवक्त्याचा हवाला देत news.com.au ने सांगितले की, या घटनेत सहभागी असलेल्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. प्रवक्त्याने पुढे सांगितले की, "आम्हाला क्राउन पर्थ येथे एका अतिथीचा समावेश असलेल्या गोपनीयतेच्या घटनेची माहिती मिळाली आहे." आमच्या पाहुण्यांची सुरक्षा आणि गोपनीयता ही आमची पहिली प्राथमिकता आहे. या घटनेमुळे आम्ही खूप निराश झालो आहोत. सहभागी अतिथीची आम्ही बिनशर्त माफी मागतो.''

Virat Kohli
Virat Kohli श्रीमंत किकेटपटुंच्या यादीत दुसऱ्या स्थानी

कॉन्ट्रेक्टरला हटवले

एका विधानानुसार, 'आम्ही अशा वर्तनासाठी 'झिरो टॉलरन्स'' धोरणाचे पालन करतो. यासाठी क्राउन हॉटेलने तातडीने पावले उचलली आहेत. यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना हटवण्यात आले आहे. त्याचबरोबर, हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तात्काळ हटवण्यात आला आहे. याशिवाय घटनेचा तपास सुरु आहे. हॉटेल व्यवस्थापनाने पुढे सांगितले की, 'आम्ही भारतीय क्रिकेट संघ आणि आयसीसीलाही (ICC) सहकार्य करत आहोत.'

Virat Kohli
Virat Kohli: सिडनीमध्ये किंग कोहलीने मोडला क्रिकेटच्या देवाचा विक्रम

पर्थमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला

पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा हा पहिला पराभव होता. भारत आता आपल्या गटात नंबर-2 वर घसरला आहे. टीम इंडियाचे (Team India) 3 सामन्यांत 4 गुण आहेत, तर अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे तेवढ्याच सामन्यांत 5 गुण आहेत. बांगलादेश 4 गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर चौथ्या क्रमांकावर झिम्बाब्वे (3 गुण) आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com