सचिनच्या कोरोना पॉझिटिव्ह ट्विटवर पीटरसनचा प्रश्न, युवीने दिला असा रिप्लाय

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

''मला कोवीड-19 रोग झाला आहे असे एखादी व्यक्ती का जाहीर करत असेल कृपया मला हे सांगू शकेल का?'' असं केवीन पीटरसनने आपल्य़ा ट्विटमध्ये म्हटले.

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची घोषणा केल्यानंतर इंग्लंडचा माजी फलंदाज केवीन पीटरसन काही तासानंतर ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने म्हटले की, 'लोक आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची घोषणा का करतात असा प्रश्न विचारला'. त्याच्या या चर्चेमध्ये टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंग ही सामील झाला.

''मला कोवीड-19 रोग झाला आहे असे एखादी व्यक्ती का जाहीर करत असेल कृपया मला हे सांगू शकेल का?'' असं केवीन पीटरसनने आपल्य़ा ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर युवराजने लगेच उत्तर दिले, ‘’आणि तुला हे आजच का सुचलं, या आधी तुला हे का नाही सुचलं. यापूर्वी तु असा विचार का केला नाहीस?’’ (Petersens question on Sachin Coronas positive tweet UVs reply)

INDvsENG: पुण्यातील वनडे सामन्यावेळी टेकडीवर रंगला होता सट्टेबाजीचा 'खेळ...

पीटरसनने यावर लगेच स्पष्टीकरण दिले, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे मला माहित नव्हते. सचिनने कोवीड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची घोषणा केल्यानंतर लगेच केवीन पीटरसनचे ट्विट आल्यामुळे क्रिकेट चाहत्यांचे या ट्विटने लक्ष वेधले होते. माझा प्रश्न हा कुतुहलापोटी होता, माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. असं त्याने ट्विटमध्ये नमूद केले आहे.

''हा एक साधा, सरळ आणि निरुपद्रवी प्रश्न होता. अनेक लोक आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची घोषणा करतात. त्यांना माहीत आहे जे लोक त्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी सुध्दा लवकरात लवकर कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, यावरुन हा अर्थ होतो.. धन्यवाद'' ... असं पीटरसनने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले.

संबंधित बातम्या