पाकिस्तानच्या खेळाडूचा होळी खेळतानाचा फोटो होतोय चांगलाच व्हायरल; वाचा कोण आहे तो

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

वासीम अक्रमनेही एक खास फोटो शेअर करत होळीच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे हा फोटो 34 वर्षापूर्वीचा आहे.

जभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय बनत असताना सोमवारी संपूर्ण देशभरात होळीचा सण साजरा करण्यात आला. कोरोना संकटातही अनेक टिकाणी लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत होळी साजरी केली. सोशल मिडियावरुन भारतीय संघातील अनेक दिग्गज खेळाडूंनी आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. याच दरम्यान पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वासीम अक्रमनेही एक खास फोटो शेअर करत होळीच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे हा फोटो 34 वर्षापूर्वीचा आहे.

गौतम भिवानी य़ांनी वासीमचा फोटो आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे. भारत आणि पाकिस्तान संघाने एकाच पूलमध्ये होळी साजरी केली होती. या फोटोमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वासीम अक्रम दिसत आहे. भिवानी यांनी या फोटोला ‘’माझ्या आवडत्या क्रिकेट होळीची आठवण,’’ असे कॅप्शन दिले आहे. 

IND vs ENG:  शार्दुलला ‘मॅन ऑफ द मॅच’ मिळायला हवी होती; विराटनं भुवीचंही घेतलं...

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली 1987 साली पाकिस्तानी संघ भारत दौऱ्यावर आला होता. या दोन्ही संघामध्ये सहा सामन्यांची एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. त्यावेळी वासीम पाकिस्तान संघाचा एक भाग होता. त्यावेळी वासीम 20 वर्षाचा होता.

वासीम अक्रमचे नाव पाकिस्तान क्रिकेटमधील एक महान खेळाडू म्हणून घेतले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये वासीमने 6615 धावा केल्या आणि एकूण 915 बळी घेतले होते.

 

संबंधित बातम्या