विराट कोहलीचा 'क्वारंटाईन लूक' व्हायरल; पाहा फोटो

Virat Kohli
Virat Kohli

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार(Captain Indian cricket team) विराट कोहली(Virat Kohali) क्रिकेटशिवाय वेगवेगळ्या ब्रँड व्हॅल्यू आणि फॅशनसाठीही परिचित आहेत. अनेक फॅन्स त्याच्या लूकमुळे त्याला फॉलो करतात. मुलींना त्याचा फॅशन सेन्स आवडतो, तर मुलं त्याच्या फॅशन ला फॉलो करतातच. नुकताच विराट कोहलीचा न्यू लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत विराट कोहली फक्त शॉर्ट हेअरकट आणि दाढीमध्ये दिसला होता, पण अलीकडेच त्याचा नवा लुक व्हायरल झाला असून त्याचे लांब केस आणि लांब दाढी दिसत आहे. ट्विटरपासून ते इंस्टाग्रामपर्यंत कोहलीचा हा लूक लोकांना खूपच आवडला असून सोशल मीडियावर त्याच्या लूकवर मीम्स आणि फनी कमेंट्सदेखील शेअर केल्या जात आहेत.(PHOTO Virat Kohli quarantine look goes viral)

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या भारतीय संघासह मुंबईत हॉटेलमध्ये आहे आणि तो 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये आपला वेळ घालवत आहे. यादरम्यान त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला, ज्यामध्ये तो फ्रेश लूकमध्ये दिसला. मुंबईतील होम क्वॉरंटाइनचे 14 दिवस पूर्ण होताच तो संघासह इंग्लंड दौर्‍यावर रवाना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ 18 जूनपासून न्यूझीलंड क्रिकेट संघा विरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणार आहे. त्यानंतर तो इंग्लंड क्रिकेट टीम विरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भाग घेणार आहे.

दरम्यान विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील सर्वाधिक मानधन घेणार्‍या क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. 2020 च्या फोर्ब्सच्या यादीमध्ये पहिल्या 100 एथलीट्समध्ये विराट एकमेव भारतीय ठरला होता. बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक करारामध्ये टीम इंडियाच्या कर्णधाराचे नाव ए + ग्रेड मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, त्यानुसार विराटला दरवर्षी 7 कोटी रुपये मिळणार आहे. जागतिक क्रिकेटमध्ये कमाई करण्यात कोहली आघाडीवर असला तरी कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पगारा मिळविण्यात तो इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटच्या मागेच आहे0. ईसीबीच्या 2020/21 टेस्ट करारानुसार, रूटला विराटपेक्षा जास्त पगार मिळतो. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com