भारतीय फुटबॉलपटूंचा 'हा' फोटो इंटरनेटवर होतोय तूफान व्हायरल, कारण...

हा फोटो भारतीय फुटबॉल संघाने ट्विटरवर केला होता पोस्ट
Pic of 3 Indian footballers praying together before a match goes viral
Pic of 3 Indian footballers praying together before a match goes viralDainik Gomantak

सामना जिंकण्यापूर्वी एकत्र प्रार्थना करताना भारतीय फुटबॉलपटूंचा फोटो इंटरनेटवर व्हायरल (viral) झाला आहे. शनिवारी मनामा येथे खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा 3-0 असा पराभव करत दुसऱ्या हाफमध्ये तीन गोल केले.

भारत बेलारूसकडून फुटबॉल सामना हरला असला तरी, तीन भारतीय फुटबॉलपटूंचा हा प्रार्थना करतानाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. शनिवारी सामना सुरू होण्यापूर्वी तिन्ही फुटबॉलपटू आपापल्या श्रद्धांनुसार प्रार्थना करताना या फोटोत दिसत आहेत.

Pic of 3 Indian footballers praying together before a match goes viral
विराट कोहलीची जसप्रीत बुमराहबद्दलची 'ती' प्रतिक्रिया आली समोर

हा फोटो भारतीय फुटबॉल (Football) संघाने ट्विटरवर पोस्ट केला होता आणि नंतर सोशल मीडिया (social media) प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. या तीन खेळाडूंच्या फोटोने भारतातील सर्वधर्म समभावना समोर आली आहे. तसेच एक राष्ट्र म्हणून आपण यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अनेक मीम्स आणि GIF ने देखील इंटरनेटवर याची प्रशंसा केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com