इंग्लंडच्या पराभवानंतर पीटरसनने टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा; केलं हिंदीत ट्विट!

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पाहुण्या इंग्लंड संघाकडून मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन करत मालिकेत बरोबरी साधली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पाहुण्या इंग्लंड संघाकडून मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन करत मालिकेत बरोबरी साधली आहे. चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाला तब्बल 317 धावांनी पराभूत केले आहे. त्यानंतर इंग्लंड संघाचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने सोशल मीडियाच्या ट्विटरवरून पुन्हा एकदा हिंदीमध्ये ट्विट करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.   

ICC World Test Championship फायनलमध्ये न्यूझीलंड सोबत कोण करणार दोन हात?  

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. पहिल्याच सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाला 227 धावांनी पराभूत केले होते. आणि त्यानंतर इंग्लंड संघाचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने सोशल मीडियाच्या ट्विटर हिंदीत ट्विट करत, टीम इंडियाला आणि चाहत्यांना डिवचले होते. मात्र त्यानंतर आता भारतीय संघाने पुन्हा एकदा मालिकेत जोरदार पुनरागमन केल्यानंतर केव्हिन पीटरसनने हिंदीमध्ये एक मजेशीर ट्विट करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.      

इंग्लंडसोबतच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर केलेल्या ट्विट मध्ये केव्हिन पीटरसनने, टीम इंडियाला उद्देशून '' बधाई हो इंडिया, इंग्लंड को भी हराने के लिये,'' असे म्हटले आहे. केव्हिन पीटरसनची भारतात सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे. आणि यापूर्वी देखील त्याने आपले काही ट्विट हिंदीत केल्याचे पाहायला मिळाले होते. तर पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने विजय मिळवल्यानंतर देखील त्याने हिंदीत ट्विट केले होते. त्यावेळी केव्हिन पीटरसनने, ''इंडिया, तुम्हाला लक्षात आहे जेंव्हा मी तुम्हाला अगोदरच चेतावणी दिली होती की ऑस्ट्रेलियाच्या संघाला नमवून आल्यानंतर जास्त उत्सव साजरा करू नका,'' असे लिहिले होते. परंतु आता दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर केव्हिन पीटरसनने हिंदीत केलेले ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.    

दरम्यान, कोरोनाच्या काळानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. आणि याठिकाणी भारतीय संघाने कांगारूंना चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2 - 1 ने पराभूत करत मालिका जिंकली होती. भारतीय संघाला अ‍ॅडिलेड येथे झालेल्या पहिल्या डे नाईट सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला होता. त्यानंतर सिडनीतील सामना अनिर्णित ठरला. आणि चौथ्या आणि शेवटच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवत मालिका आपल्या खिशात घातली होती. यानंतर इंग्लंड सोबतच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताने पुन्हा दुसऱ्या सामन्यात चांगला खेळ करत विजय मिळवला आहे. 

संबंधित बातम्या