खेळपट्टी सप्टेंबरपर्यंत सामन्यांसाठी सज्ज

Dainik Gomantak
बुधवार, 3 जून 2020

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ततेची डेडलाईन पाळल्याचे समाधान : मयेकर

पणजी

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावरील क्रिकेट खेळपट्टी प्रत्यक्ष सामन्यासाठी येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत सज्ज होईलअसा विश्वास गोवा क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांनी मंगळवारी व्यक्त केला.

मैदानावरील पाचही खेळपट्ट्यातसेच दोन्ही सराव खेळपट्ट्यांचे काम आता पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ततेची डेडलाईन पाळल्याचेच जास्त समाधान आहे. लॉकडाऊनचा अडथळा नसतातर काम आणखीनच लवकर संपले असतेअसे मयेकर यांनी नमूद केले. त्यांनी सांगितलेकी ‘‘८ मे रोजी खेळपट्टीच्या कामास सुरवात झाली. २६ दिवसानंतर मुख्य खेळपट्ट्यांव्यतिरिक्त दोन्ही सराव खेळपट्ट्यावरील हिरवळ रोपणाचे काम आज संपले. आता जुजबी कामे बाकी आहेत. हिरवळ पूर्णपणे रूजल्यानंतरऑगस्ट महिन्यात खेळपट्ट्यांचे सपाटीकरणरोलिंग आदी प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत खेळपट्टी सामन्यासाठी सज्ज होण्याचे अंदाज आहेत.’’

बीसीसीआय मान्यताप्राप्त पीच क्युरेटर सूर्यकांत नाईक यांनी खेळपट्टी कामाची मुख्य जबाबदारी पेलली. पणजी जिमखान्याचे सदस्य नरहर (ताता) ठाकूरप्रकाश मयेकर यांनी सन्वयकाची कामगिरी चोख पार पाडली. विवेक पेडणेकर यांचाही हातभार लागला. दरदिवशी २० पेक्षा जास्त मजूर खेळपट्टीच्या कामासाठी अथकपणे वावरले. पणजी जिमखान्याबरोबरच्या सामंजस्य करारांतर्गत गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) खेळपट्ट्यांचे काम केले आहे. पणजी जिमखान्याच्या नूतनीकरणांतर्गत भाऊसाहेब बांदोडकर मैदानाचाही चेहरामोहरा बदलला आहे.

‘‘खेळपट्टीसाठी आवश्यक खास माती दुसऱ्या राज्यातून मागवावी लागली. लॉकडाऊन लागू असताना जीसीएकडे उपलब्ध हैदराबादची माती वापरून मुख्य दोन खेळपट्ट्या बनविण्यात आल्या. तिसऱ्या खेळपट्टीसाठी खानापूरचीतर अन्य दोन खेळपट्ट्यांसाठी हुबळीजवळून आणलेली माती वापरण्यात आली. खेळपट्टी बांधकामासाठी मातीतसेच वाळू उपलब्धीत लॉकडाऊन निर्बंधामुळे खूपच त्रास झाला,’’ असे मयेकर यांनी सांगितले.

७० यार्डाचे अंतर

मैदानाच्या मध्यास असलेल्या दोन खेळपट्ट्यांपासून सीमारेषेपर्यंतचे अंतर ७० यार्डाचे असून स्पर्धात्मक क्रिकेटसाठी ते योग्य असल्याचे मत मयेकर यांनी व्यक्त केले. प्राप्त माहितीनुसारखेळपट्ट्यांसदर्भात अत्यावश्यक तांत्रिक बाबी तपासण्याच्या उद्देशाने या मैदानावर अगोदर राज्य पातळीवरील सामने खेळविण्याचे जीसीएचे नियोजन आहे. बीसीसीआयचे वयोगट आणि महिला गट सामनेतसेच भविष्यात रणजी सामने घेण्यासाठी जीसीएला आता पर्यायी मैदान उपलब्ध झाले आहे. जानेवारी २००६ नंतर गोव्यातील या ऐतिहासिक मैदानावर रणजी करंडक क्रिकेट सामना झालेला नाही.

संबंधित बातम्या