या खेळाडूने अश्विनला म्हटले ‘टीम इंडियाचा रॉकस्टार’

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

आयपीएल 2020 नंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या चार कसोटी मालिकेमध्ये अश्विनने शानदार प्रदर्शन केले.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील ऑफ स्पिनर गोलंदाज आर.अश्विन सध्या त्याच्य़ा गोलंदाजीमुळे फॉर्ममध्ये आहे. कोरोना महामारीनंतर क्रिकेटला सुरुवात झाली. त्यानंतर अश्विनच्या गोलंदाजीमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. आयपीएल 2020 नंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या चार कसोटी मालिकेमध्ये अश्विनने शानदार प्रदर्शन केले. फक्त गोलंदाजीतच नाहीतर फंलदाजीमध्ये सुध्दा अश्विनने आपला जलवा दाखवला आहे. तसेच भारतात पार पडलेल्या भारत आणि इंग्लड यांच्यातील कसोटी सामन्यामध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. मागील तीन कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेत एका कसोटी सामन्यात शतकसुध्दा लगावले.

41, 44 की 46 शाहिद आफ्रिदीचा नेमका वाढदिवस कितवा...?ट्विटनंतर पेटला नवीन वाद

अहमदाबादमध्ये इंग्लंड विरुध्दच्या कसोटी सामन्यात अश्विनने कसोटी क्रिकेटमधील 400 विकेट पूर्ण केल्या, तसेच अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 600 विकेटही पूर्ण केल्य़ा आहेत. 4 मार्चला भारत आणि इंग्लंड याच्यांत चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान भारतीय पूर्व क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोपडाने अश्विनवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. आकाशने ‘’आश्विनला मॅच विनर म्हटले आहे. 77 सामन्यांमध्ये 400 विकेट घेणे हे खूप कमालीचे आणि आश्चर्य व्यक्त करण्यास लावणारे आहे. तो गोलंदाजीमध्ये मॅच्युअर झाला आहे. आणि त्याचबरोबर तो बऱ्याच कालावधीपासून टीम इंडियासाठी शानदार प्रदर्शन करत आहे. तसेच टीम इंडियासाठी मॅच विनरही ठरला आहे.’’

टीम इंडियाने सध्या अहमदाबादमध्ये इंग्लंड विरुध्द खेळल्या जात असलेल्या चार कसोटी सामन्यांमध्य़े 2-1 ने आघाडी घेतली आहे. जागतिक कसोटी चैंपियनशिपच्या फाइनलमध्ये पोहचण्यासाठी 4 मार्चला भारत आणि इंग्लड यांच्यात पार पडत असलेल्या सामन्यामध्ये जिंकणे किंवा सामना अनिर्णीत राखणे भारतासाठी आवश्यक असणार आहे.

संबंधित बातम्या