IPL 2021 Auction: 'हा' खेळाडू आयपीएल हंगामात खेळू शकणार नाही; नाराज होत केली पोस्ट

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा 14 व्या इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) हंगामाची सुरुवात होणार आहे.

चेन्नई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा14 व्या इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) हंगामाची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी चेन्नईमध्ये पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसला आयपीएलच्या एकूण इतिहासातील सर्वाधिक मोठी बोली लागली. 16 कोटी 25 लाख रुपये देत त्याला  राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात समावेश करुन घेतला आहे. त्य़ानंतर ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेललाही मोठी बोली लागली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला 14 कोटी 25 लाखांची बोली लावून रॉयल चॅलंजर्स बेंगलोरने आपल्य़ा संघात घेतले आहे. या आयपीएलच्या हंगामात अनेक उदयोन्मुख खेळाडूंनाही मोठी बोली लागली आहे. मात्र इंग्लंडचा सलामीवर फंलदाज जेसन रॉयवर या आयपीएलच्या हंगामात कोणत्य़ाच संघाने बोली लावली नाही,त्यामुळे त्याने आपली नाराजी सोशल मिडीयावरुन व्यक्त केली आहे.

IPL 2021 Auction : घरात टीव्ही नव्हता, आता तोच ट्वीव्हीवर खेळताना दिसणार

जेसन रॉय यापूर्वी दिल्ली कॅपिटल संघाचा सदस्य होता. मात्र त्याने गेल्या आयपीएलच्या हंगामात आपल्य़ा वैयक्तिक कारणांनमुळे न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावर्षी पार पडलेल्या आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत त्याच्य़ावर कोणत्य़ाच संघाने बोली लावली नाही. त्यामुळे त्याने नाराज होत यंदाच्या आयपीएलचा आपण भाग बनू न शकल्यामुळे ही खूप लाजिरवाणी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमातून दिली आहे.
''या वर्षी पार पडत असणाऱ्या आयपीएलचा भाग नसंण ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, पण ज्यांची निवड झाली त्यांचं आणि विशेषत: ज्यांच्यावर या आयपीअएलच्या हंगामात सर्वाधिक बोली लागली त्यांचं मी खूप अभिनंदन करतो... या वर्षी आयपीएल बघायला खूप आनंद येणार आहे,'' अशा आशयाची पोस्ट जेसन रॉयने सोशल मिडीयावर केली आहे.

 

संबंधित बातम्या