Police Cup Football: शापोराचा एफसी गोवास धक्का

पोलिस कप फुटबॉल: पेनल्टी शूटआऊटवर विजय, गोलरक्षक सोमा चमकला
Police Cup Football
Police Cup FootballDainik Gomantak

पणजी: गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी गतविजेत्या एफसी गोवाचे आव्हान पहिल्याच फेरीत आटोपले. निर्धारित वेळेतील 2-2 गोलबरोबरीनंतर त्यांना शापोरा युवक संघाने पेनल्टी शूटआऊटवर 4-3 फरकाने हरविले.

(Police Cup Football Shapora Youth Team defeated FC Goa )

Police Cup Football
Asia Cup 2022 पूर्वी वसीम अक्रमने सांगितली पाक संघाची कमजोरी

सामना पर्रा येथील पीव्हीसी मैदानावर मंगळवारी झाला. निर्धारित वेळेत सामन्यातील सर्व गोल पूर्वार्धातील खेळात झाले. सच्चिदानंद साटेलकर याच्या गोलमुळे शापोरा युवक संघाने 16 व्या मिनिटास आघाडी प्राप्त केली. प्रतीक दाभोळकरच्या क्रॉस पासवर हा गोल झाला.

Police Cup Football
World Cup 2023 पूर्वीच वेस्ट इंडिजला मोठा धक्का, आयर्लंडला पुढे जाण्याची संधी

नंतर दोन गोल नोंदवून एफसी गोवा युवा संघाने 2-1 अशी आघाडी प्राप्त केली. 25 व्या मिनिटास अमेन अत्तार याने बरोबरीचा गोल केला, तर ब्रायसन परेराने 41व्या मिनिटास एफसी गोवास आघाडी मिळवून दिली, मात्र हा आनंद जास्तकाळ टिकला नाही. रोहित तोताड याने 44 व्या मिनिटास शापोराच्या संघासाठी बरोबरीचा गोल केला. सामन्याच्या 69 व्या मिनिटास एफसी गोवाच्या व्हर्स्ली पेस याचा 25 यार्डावरील ताकदवान फटका शापोराचा गोलरक्षक सोमा कोरगावकर याने वेळीच रोखला, त्यामुळे बरोबरीची कोंडी कायम राहिली.

पेनल्टी शूटआऊटमध्ये शापोरा युवक संघासाठी प्रतीक धारगळकर, स्टीफन मार्टिन्स, अक्षय दाभोळकर व हर्षद गावकर यांनी अचूक नेमबाजी साधली. एफसी गोवातर्फे आल्फियानो फर्नांडिस, प्रचित गावकर, सिडरॉय कार्व्हालो यशस्वी ठरले. उपांत्यपूर्व फेरीत शापोरा युवक संघासमोर चर्चिल ब्रदर्स संघाचे आव्हान असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com